Join us  

३ डोस : पाॅलिसीत सूट, इरडाईची विमा कंपन्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 11:50 AM

प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कोविड-१९ साथीबाबत जागृती वाढविण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

नवी दिल्ली : कोविड-१९ लसीचेतीन डोस घेणाऱ्या नागरिकांना सामान्य व आरोग्य विमा पॉलिसीच्या नूतनीकरणात सूट देण्यात यावी, अशी सूचना ‘भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणा’ने (इरडाई) विमा कंपन्यांना केली आहे. कोविड-१९ शी संबंधित सर्व दावे तातडीने निकाली काढण्यात यावेत; तसेच कागदोपत्री कार्यवाही कमीत कमी कशी करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही इरडाईने जीवन व बिगरजीवन विमा कंपन्यांना सांगितले आहे. 

इरडाईने काय म्हटले?प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कोविड-१९ साथीबाबत जागृती वाढविण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इरडाईने विमा कंपन्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. नियामकाने म्हटले की, आपल्या आरोग्य नेटवर्कच्या माध्यमातून आरटी-पीसीआर चाचणी करण्यास विमा कंपन्यांनी आपल्या पॉलिसीधारकांना प्रोत्साहन लाभ द्यावा. समाजमाध्यमांवरून लोकांना कोविडचे नियम पाळण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे.

टॅग्स :कोरोनाची लसआरोग्य