Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३० दिवसांची वैधता, एकूण ६५०० जीबी डेटा; पाहा किंमत आणि कोणता आहे हा Broadband प्लॅन

३० दिवसांची वैधता, एकूण ६५०० जीबी डेटा; पाहा किंमत आणि कोणता आहे हा Broadband प्लॅन

पाहा कोणता आहे हा ब्रॉडबँड प्लॅन आणि काय मिळतायत बेनिफिट्स.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 10:43 PM2022-01-29T22:43:18+5:302022-01-29T22:44:01+5:30

पाहा कोणता आहे हा ब्रॉडबँड प्लॅन आणि काय मिळतायत बेनिफिट्स.

30 days validity total 6500 GB data See the price and what is this Broadband plan get unlimited calling bsnl airtel reliance jio | ३० दिवसांची वैधता, एकूण ६५०० जीबी डेटा; पाहा किंमत आणि कोणता आहे हा Broadband प्लॅन

३० दिवसांची वैधता, एकूण ६५०० जीबी डेटा; पाहा किंमत आणि कोणता आहे हा Broadband प्लॅन

जर तुम्हाला घरून काम करण्यासाठी किंवा ऑनलाइन अभ्यासासाठी अधिक डेटा असलेला प्लॅन हवा असेल, तर BSNL एक चांगला ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करत आहे. विशेष बाब म्हणजे या धमाकेदार प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी एकूण 6.5TB (म्हणजे 6500 GB) डेटा उपलब्ध आहे. केवळ डेटाच नाही तर प्लॅनमधील स्पीडही खूप चांगला आहे. या प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी 300 Mbps युनिफॉर्म अपलोडिंग आणि डाऊनलोडिंग स्पीडसोबत हायस्पीड मिळतो. याशिवाय, अनलिमिडेट कॉलिंगसाठी विनामूल्य फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील उपलब्ध आहे. यासाठीही कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. कंपनीचा हा नवा प्लॅन नाही, 2021 पासूनच कंपनी या प्लॅनवर ऑफर देत आहे.

BSNL हा प्लॅन (फायबर रुबी) भारत फायबर ग्राहकांना 4499 रुपये प्रति महिना दरानं ऑफर केला जातआहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध असल्यामुळे या प्लॅनची किंमत अधिक आहे. दरम्यान, तुम्हाला निराश करणारी एक गोष्ट म्हणजे या प्लॅनची किंमत अधिक असूनही कोणतेही OTT मिळत नाही. याशिवाय FUP डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 40 Mbps पर्यंत कमी होतो.

एअरटेल, जिओमध्ये अनेक बेनिफिट्स
एअरटेल, रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये यापेक्षा अधिक बेनफिट्स देण्यात येतात. अशावेळी या कंपन्या 1 जीबीचा स्पीड ऑफर करत असतील तर केवळ 300 एमबीपीएसच्या स्पीडसाठी 4 हजार रुपये का खर्च करावे असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो.

बीएसएनएलचे अन्य दोन प्लॅन्स
BSNL आपल्या ग्राहकांना 1499 रुपये आणि 2499 रुपयांचे ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते. या दोन्ही प्लॅनमध्ये 300 Mbps स्पीड ऑफर केला जातो. 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 4TB डेटा देण्यात येतो, तर 2499 रुपयांचा प्लॅन 5TB डेटासह येतो.

Web Title: 30 days validity total 6500 GB data See the price and what is this Broadband plan get unlimited calling bsnl airtel reliance jio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.