लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : औद्याेगीक क्षेत्रात विशेषत: तंत्रज्ञान क्षेत्रातील ऑटाेमेशन अतिशय वेगाने वाढत आहे. परिणामी, आयटी क्षेत्रातील सुमारे ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नाेकऱ्या जाण्याची शक्यता बँक ऑफ अमेरिकेने वर्तविली आहे. बँकेच्या एका अहवालानुसार देशांतर्गत साॅफ्टवेअर कंपन्या २०२२ पर्यंत माेठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करू शकतात. त्याद्वारे या कंपन्या सुमारे १०० अब्ज डाॅलर्सची बचत करतील, असा अंदाज आहे.
‘नॅसकाॅम’नुसार आयटी कंपन्यांनी सुमारे १६ दशलक्ष लाेकांना नाेकऱ्या दिल्या आहेत. त्यापैकी ९ दशलक्ष कर्मचारी हे अल्पकुशल आणि ‘बीपीओ’ क्षेतात आहेत. यापैकी ३० लाख नाेकऱ्या धाेक्यात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या हातचे काम ‘राेबाे प्राेसेस ऑटाेमेशन’द्वारे पूर्ण करण्यात येईल. याचा अमेरिकेवर सर्वाधिक वाईट परिणाम हाेणार असून, सुमारे १ दशलक्ष लाेकांवर राेजगार गमाविण्याची कुऱ्हाड काेसळण्याची शक्यता बँक ऑफ अमेरिकेने व्यक्त केली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे उदयाेन्मुख बाजारापेठांमधील नाेकऱ्यांवर सर्वाधिक धाेका आहे.
n टीसीएस, इन्फाेसिस, विप्राे, एचसीएल, टेक महिंद्र, काॅग्नीझंट इत्यादी कंपन्या २०२२ पर्यंत कमी कुशल श्रेणीतील ३० लाख जणांना कामावरून कमी करण्याच्या विचारात आहेत.n राेबाे प्राेसेस ऑटाेमेशन हे एकप्रकारचे विविध साॅफ्टवेअर अप्लीकेशन आहे. त्याद्वारे कर्मचाऱ्यांप्रमाणे हुबेहुब काम हाेते. एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष ठेवण्यास मदत हाेते. त्यातून कामाची गती वाढविते. त्यामुळे वेळेची माेठ्या प्रमाणात बचत हाेते.
n भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षाला २५ हजार आणि अमेरिकन कर्मचाऱ्याच्या पगारावर ५० हजार डॉलर्स खर्च हाेताे. कर्मचारी कपातमुळे १०० अब्ज डॉलरची बचत होणार आहे. याशिवाय ‘आरपीए’मुळे १० अब्ज डाॅलर्सची अतिरिक्त बचतही हाेणार आहे.
प्रमुख अर्थव्यवस्थांना जाणवते कामगार टंचाईव्यापक प्रमाणात ऑटोमेशन असूनही जर्मनी (२६%), चीन (७%), भारत (५%), दक्षिण कोरिया, ब्राझील आणि रशिया यासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांना कामगार टंचाईचा सामना करावा लागत आहे. असे असले तरीही भारत आणि चीन या देशांना कुशल कर्मचाऱ्यांचा माेठ्या दुष्काळाचा सामना करावा लागू शकताे, असा इशारा या अहवालातून देण्यात आला आहे.