Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबीक्विकची ३00 कोटींची गुंतवणूक

मोबीक्विकची ३00 कोटींची गुंतवणूक

मोबाइल वॉलेट सेवा देणारी मोबीक्विक कंपनी व्यवसाय विस्तारासाठी ३00 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 12:53 AM2017-02-24T00:53:50+5:302017-02-24T00:53:50+5:30

मोबाइल वॉलेट सेवा देणारी मोबीक्विक कंपनी व्यवसाय विस्तारासाठी ३00 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

300 crores of investment for Mobyquick | मोबीक्विकची ३00 कोटींची गुंतवणूक

मोबीक्विकची ३00 कोटींची गुंतवणूक

मुंबई : मोबाइल वॉलेट सेवा देणारी मोबीक्विक कंपनी व्यवसाय विस्तारासाठी ३00 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सध्या कंपनीचे ५0 दशलक्ष वापरकर्ते असून, २0१७पर्यंत ते १५0 दशलक्ष करण्याची कंपनीची योजना आहे.
कंपनीने एक निवेदन काढून ही माहिती दिली. कंपनीने म्हटले की, वापरकर्त्यांच्या वाढीमुळे मोबीक्विकचे वार्षिक सकळ व्यापारी मूल्य वर्षअखेरीस वाढून १0 अब्ज डॉलर होईल. सध्या ते २ अब्ज डॉलर आहे. कंपनीच्या सहसंस्थापक उपासना टाकू यांनी सांगितले की, आमच्या वापरकर्त्यांची संख्या वाढवून १५0 दशलक्ष करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. तसेच जीएमव्ही १0 अब्ज डॉलरवर नेण्यात येणार आहे. ३00 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक विविध प्रकल्पांत वापरली जाईल. निष्ठा पुढाकार, पोहोच वाढविणे, नेटवर्क आणि कर्ज व गुंतवणुकीसारख्या वित्तीय सेवा सेवा निर्माण करणे यांचा त्यात समावेश आहे. कंपनी ‘सुपरकॅश’ नावाची सेवा सुरू करीत आहे. त्याद्वारे डिजिटल अदायगीला प्रोत्साहन दिले जाईल.

Web Title: 300 crores of investment for Mobyquick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.