नवी दिल्ली : पुरेशा पावसाअभावी दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्यास खरीपाची उभी पिके वाचिवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना डिझेल आणि बियाणांसाठी ३०० कोटी रुपयांची सबसिडी घोषित केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत या सबसिडीला मंजुरी देण्यात आली. फळबागा वाचविणे आणि चारा पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ही सबसिडी देत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सिंचनाखालील पिकांच्या संरक्षणासाठी १०० कोटी रुपयांची डिझेल सबसिडी दिली जाणार आहे. एकात्मिक फळबाग विकास अभियानातहत १५० कोटी, तर चारा विकास कार्यक्रमासाठी ५० कोटी दिले जाणार आहेत. या सबसिडीमुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील रायलसीमा, कर्नाटकातील उत्तरेकडील विभाग आणि बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मदत होईल.
शेतकऱ्यांना ३०० कोटींची सबसिडी
By admin | Published: August 13, 2015 1:36 AM