Lokmat Money > बिझनेस न्यूज > द्राक्ष निर्यातीत ३० हजार टनांची घट

द्राक्ष निर्यातीत ३० हजार टनांची घट

द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून द्राक्ष निर्यातीत यंदा तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:49 PM2018-05-17T23:49:53+5:302018-05-17T23:49:53+5:30

द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून द्राक्ष निर्यातीत यंदा तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे.

30,000 tons reduction in wheat exports | द्राक्ष निर्यातीत ३० हजार टनांची घट

द्राक्ष निर्यातीत ३० हजार टनांची घट

नाशिक : द्राक्ष निर्यातीमध्ये भारतातील ऐंशी टक्के वाटा असणाऱ्या नाशिकचा हंगाम आटोपला असून द्राक्ष निर्यातीत यंदा तीस हजार मेट्रिक टनांची घट झाली आहे. नैसर्गिक संकटांमुळे निर्यात मंदावली असली तरी सरासरी भाव मिळाल्याने बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिकहून द्राक्षांची सर्वाधिक निर्यात युरोपात होत असते. सप्टेंबरच्या मध्यात छाटणी झालेल्या बागांना परतीच्या पावसाने दिलेल्या फटक्यामुळे बाजारातील आवक घटणार असल्याचा अंदाज होता. आॅक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून पडलेल्या पावसामुळे अनेक बागांचे मोठे नुकसान झाले. नंतर डावणीचाही प्रादुर्भाव दिसून आला. तरीही शेतकºयांनी हार मानली नाही. त्यात आॅक्टोबरचे पहिले चार दिवस सोडले तर त्यानंतर निसर्गाने चांगली साथ दिल्याने राहिलेला माल चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत झाली. परंतु तोवर साधारणपणे वीस ते तीस टक्के नुकसान झाल्याचे दिसून आले.
तूर्तास बागायत पट्ट्यांमध्ये
रूई, धारणगाव निफाडचा काही
भाग, खेडगाव, अंतरवेली, साकोरे
मिग व अन्यत्र काही प्रमाणात माल उपलब्ध आहे.
>विविध भागांतून १०७ टन
नाशिकमधून द्राक्षांच्या विविध जातींची
८० टक्के निर्यात होते. परंतु यंदा सांगली, सातारा, लातूर, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, बीडसह कर्नाटकमधूनही १०७ टनांची निर्यात झाली. परंतु भावातील चढउतारामुळे सरासरी भाव मिळण्यात मोठी कसरत करावी लागली.
>102814 टन द्राक्षे यंदा निर्यात झाली. गेल्या वर्षी निर्यात १,३१,९८० टन होती. त्यात युरोपीय देशांत ८०,८१९ मे. टन तर अन्य देशांत २२,१९५ मे. टन इतकी निर्यात झाली.
>युरोप
1) नेदरलँड-४९०२५
2) जर्मनी-१६४६०
3) युके-१५५३५
4) डेन्मार्क-२३०७
>अन्य देश
1) रशिया-१८५४९
2) चायना-४५४
3) कॅनडा-२१०
4) श्रीलंका-२६६

Web Title: 30,000 tons reduction in wheat exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.