मुंबई : खातेदारांकडून परमनंट अकाउंट नंबर (पॅन) किंवा फॉर्म ६० घेण्यासाठी कर विभागाने बँकांना ३० जूनपर्यंतची मुदत दिली आहे. बँकांनी खातेदारांकडून पॅन नंबर घेण्याची मुदत २८ फेब्रुवारी रोजी समाप्त झाली होती. त्यानंतर आता ही वाढीव मुदत देण्यात आली आहे.
नियम ११४ बी नुसार अनेक व्यवहारांसाठी पॅन नंबर असणे बंधनकारक आहे. कर विभागाने जानेवारीत सर्व बँका, पोस्ट आॅफीस आणि सहकारी बँका यांना स्पष्ट केले होते की, सर्व खातेदारांकडून पॅन नंबर किंवा फॉर्म ६० घ्यावा. आयटी अॅक्टच्या नियम ११४ बी नुसार सर्व व्यवहारांची माहिती ठेवली जावी. ज्या खातेदारांनी पॅन नंबर दिलेले नाहीत त्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत द्यावेत किंवा फॉर्म ६० द्यावा, असेही सांगण्यात आले होते. फॉर्म ६० हे एखाद्या व्यक्तीकडून दिले जाणारे घोषणापत्र आहे. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर विभागाने सर्व बँकांना आणि पोस्ट आॅफिसला सूचित केले होते की, १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या काळात बचत खात्यात जमा झालेल्या २.५ लाखांपेक्षा अधिक रकमेची आणि चालू खात्यात जमा झालेल्या १२.५ लाखांपेक्षा अधिक रकमेची माहिती देण्यात यावी. एका दिवसात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक जमा रकमेचीही माहिती देण्यात यावी.
>१५ कोटी जमा
नोटाबंदीनंतर १५ लाख कोटी रुपयांच्या बाद झालेल्या नोटा पुन्हा बँकांकडे जमा झाल्या आहेत. त्यानंतर कर विभागाने या जमा रकमेची तपासणी सुरू केली आहे.
खातेदारांकडून पॅन घेण्यासाठी बँकांना ३० जूनची वाढीव मुदत
खातेदारांकडून परमनंट अकाउंट नंबर (पॅन) किंवा फॉर्म ६० घेण्यासाठी कर विभागाने बँकांना ३० जूनपर्यंतची मुदत दिली
By admin | Published: April 7, 2017 11:50 PM2017-04-07T23:50:34+5:302017-04-07T23:50:34+5:30