Join us

तीन बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी ३४ समित्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 4:18 AM

युनायटेड बँक आॅफ इंडिया (यूबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि ओरियंटल बँक आॅफ कॉमर्स (ओबीसी) यांचे विलीनीकरण सुलभतेने व्हावे यासाठी ३४ कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

कोलकाता : युनायटेड बँक आॅफ इंडिया (यूबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि ओरियंटल बँक आॅफ कॉमर्स (ओबीसी) यांचे विलीनीकरण सुलभतेने व्हावे यासाठी ३४ कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. येत्या १ एप्रिलपासून या या विलीनीकरणाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.यूबीआयचा अधिकारी म्हणाला की, या बँकांच्या एकीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ३४ कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीत तिन्ही बँकांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. कर्ज प्रक्रिया, कर्ज मुदत आणि ग्राहकांना देण्यात येणा-या लाभांचे मानकीकरण करण्याचा प्रयत्नही समित्या करतील. बँकांचे विलीनीकरण पूर्ण होईपर्यंत ग्राहकांशी संबंधित कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी हे मानकीकरण केले जाणार आहे.यूबीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ए. के. प्रधान यांनी याआधी सांगितले होते की, येत्या १ एप्रिलपर्यंत ताळेबंदाचे विलीनीकरण पूर्ण होऊ शकते. तिन्ही संस्थांत संपूर्ण सुसूत्रता निर्माण होण्यास विलीनीकरणानंतर आणखी १२ ते १४ महिने लागतील. दरम्यान, तिन्ही बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच झाली. तिन्ही बँकांच्या एकीकरणानंतर निर्माण होणारी नवी बँक एसबीआयनंतरची देशातील दुस-या क्रमांकाची मोठी बँक असेल. नव्या बँकेचा व्यवसाय १८ लाख कोटी रुपयांचा असेल.सार्वजनिक क्षेत्रातील १0 बँकांचे विलीनीकरण करून चार बँका निर्माण करण्याची घोषणा केंद्राने केली. त्यानुसार अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन केली जाईल. आंध्र बँक व कॉर्पोरेशन बँकेचे एकीकरण केले जाईल, तर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचेही विलीनीकरण केले जाईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बँकिंग क्षेत्र