Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोण आहे ही 34 वर्षीय तरुणी जी पुढच्या पिढीत सांभाळू शकते TATA समूहाची धुरा? रतन टाटांसोबत खास कनेक्शन

कोण आहे ही 34 वर्षीय तरुणी जी पुढच्या पिढीत सांभाळू शकते TATA समूहाची धुरा? रतन टाटांसोबत खास कनेक्शन

झगमगाटाच्या दुनियेपासून दूर असलेल्या माया टाटा आपल्या कामात व्यस्त आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:07 PM2024-08-02T17:07:41+5:302024-08-02T17:13:34+5:30

झगमगाटाच्या दुनियेपासून दूर असलेल्या माया टाटा आपल्या कामात व्यस्त आहे...

34-year-old maya tata can be next generation leader of tata group A special connection with Ratan Tata | कोण आहे ही 34 वर्षीय तरुणी जी पुढच्या पिढीत सांभाळू शकते TATA समूहाची धुरा? रतन टाटांसोबत खास कनेक्शन

कोण आहे ही 34 वर्षीय तरुणी जी पुढच्या पिढीत सांभाळू शकते TATA समूहाची धुरा? रतन टाटांसोबत खास कनेक्शन


मिठापासून ते विमानापर्यंत टाटा समूहाने जी भरारी घेतली आहे. त्यात जेआरडी टाटा आणि रतन टाटा यांच्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे. मात्र, आगामी काळात टाटा समूहाची धुरा कोण सांभाळणार? हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र, 34 वर्षांची माया टाटा (Maya Tata) देशातील सर्वात प्रभावी व्‍यापार‍ी साम्राज्यांपैकी एकाची धुरा साभाळण्याच्या आगदी नजीक पोहोचल्या आहेत. झगमगाटाच्या दुनियेपासून दूर असलेल्या माया टाटा आपल्या कामात व्यस्त आहे.

कोण आहेत माया टाटा, रतन टाटांसोबत खास नाते -
माया टाटा रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि अलू मिस्त्री यांची कन्या आहे. अलू या अब्जाधीश पालोनजी मिस्त्री यांच्या कन्या आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची बहीण आहे. सायरस यांच्या एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. मिस्त्री कुटुंबाचा सायरस इंव्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इंव्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमाने टाटा सन्समध्ये जवळपास 18.4 टक्के वाटा आहे. अशा प्रकारे मायाचे टाटांसोबत दुहेरी नाते तर आहेच. शिवाय, यामुळेच येणाऱ्या काळात ती टाटा ग्रुप लीड करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांभाळल्या आहेत महत्वाच्या जबाबदाऱ्या -
मायाने ब्रिटनचे बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ती नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोन टाटा यांची नात आहे. सोमन नोएल टाटा यांची आई आणि रतन टाटा यांची सावत्र आई आहे. माया यांनी टाटा कॅपिटलची सहकारी कंपनी असलेल्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंडपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. माया यांनी फंडमधील कॉर्पोरेट जगतातील जटिल डायनॅमिक्‍स समजून घेताना पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांसंदर्भातील आपले कौशल्य आणखी चांगले केले. 

माया सध्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या सहा बोर्ड मेंबर्स पैकी एक आहेत.. हे कोलकात्यातील कॅन्सर रुग्णालय आहे. याचे उद्घाटन 2011 मद्ये रतन टाटा यांनी केले होते.

इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहात मायाच्या वाढत्या प्रभावाचाही उल्लेख केला आहे माया हळू हळू मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची तयारी करत आहेत. मायाची सूक्ष्म पण, प्रभावी उपस्थिती तिला टाटा साम्राज्याचा भविष्यातील एक मुख्य खेळाडू म्हणून दर्शवते. टाटा सन्सच्या एजीएममध्ये मायाची भूमिका बघितल्यानंतर, भविष्यात समूहाची धुरा माया टाटाच्या हाती गेल्यास फार आश्चर्य वाटायला नको.

Web Title: 34-year-old maya tata can be next generation leader of tata group A special connection with Ratan Tata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.