Lokmat Money > बिझनेस न्यूज > 15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या...

15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या...

गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे देशातील अनेक बँकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक त्रास बँकांच्या ग्राहकांना होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:43 PM2023-01-06T13:43:08+5:302023-01-06T13:44:00+5:30

गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे देशातील अनेक बँकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक त्रास बँकांच्या ग्राहकांना होतो.

35 banks fail in 15 months, millions of customers in trouble; What to do if the money is lost? Find out... | 15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या...

15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या...

मुंबई: गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे देशातील अनेक बँकांची अवस्था बिकट झाली होती, तसेच रिझर्व्ह बँकेने पैशांच्या व्यवहारांवर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत सर्वाधिक त्रास बँकांच्या ग्राहकांना झाला. या घटनांमुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो की बँक कोलमडली तर त्यांच्या पैशाचं काय होणार? तुमचे खाते असलेली बँके बुडीत निघाल्यास तुम्हाला 5 लाख रुपये मिळतात. पण नियमांनुसार, जर तुम्ही बँक खात्यात 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम ठेवली असेल, तरीदेखील तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळतात.

5 लाखांपर्यंत शासन हमी देते
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कायद्यांतर्गत, बँकेतील ठेव रकमेची हमी पाच लाख रुपये आहे. यापूर्वी ही रक्कम 1 लाख रुपये होती, मात्र 2020 मध्ये केंद्र सरकारने या कायद्यात बदल करून ही रक्कम 5 लाख रुपये केली होती. म्हणजेच बँकेत जमा असलेली तुमची रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असलीतरी तुम्हाला फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. मात्र, आर्थिक संकटाने घेरलेल्या कोणत्याही बँकेला सरकार बुडू देत नाही. त्यासाठी बुडीत बँक मोठ्या बँकेत विलीन केली जाते. तरीही बँक कोसळल्यास सर्व खातेदारांना पैसे देण्याची जबाबदारी DICGC असते. या रकमेची हमी देण्याच्या बदल्यात DICGC बँकांकडून प्रीमियम घेते.

कायदा काय आहे?
RBI च्या नियमांनुसार, बँका बुडल्यास AID मध्ये सामील झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत, सर्व ग्राहकांच्या ठेवी आणि कर्जाची माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल. यानंतर, DICGC ला 90 दिवसांच्या आत ग्राहकांना पैसे परत करावे लागतात. ऑगस्ट 2022 शी संबंधित नवीन अपडेटमध्ये, DICGC ने सांगितले की ते देशातील एकूण 2,035 बँकांचा विमा देते. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या बँकेचा विमा उतरवला आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही https://www.dicgc.org.in/FD_ListOfInsuredBanks.html वर जाऊन त्याची माहिती मिळवू शकता.

35 बँका बुडाल्या
गेल्या 15 महिन्यांत देशातील 35 बँकांच्या 3 लाख ग्राहकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. याअंतर्गत सरकारने सुमारे 4 हजार कोटी रुपये लोकांना परत केले आहेत. वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेत सांगितले होते की, देशातील 35 बँकांच्या 3,06,146 ग्राहकांनी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यांतर्गत पैशांचा दावा केला आहे. ही रक्कम 1 सप्टेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत परत करण्यात आली.

Web Title: 35 banks fail in 15 months, millions of customers in trouble; What to do if the money is lost? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.