नवी दिल्ली : सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बुडवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नोएडा पोलिसांनी नुकताच केला आहे. तब्बल १० हजार कोटींचा कर चुकवल्याप्रकरणी दिल्लीतील एका व्यावसायिकाला बुधवारी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. या संपूर्ण रॅकेटचा हाच सूत्रधार असल्याचा संशय आहे. टॅक्स चोरीसाठी या इसमाने तब्बल ३५ डमी कंपन्या स्थापन केल्याचे उघडकीस आले आहे. मागील वर्षी जून महिन्यापासून सुरू असलेल्या कारवाईमुळे या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.
तुषार गुप्ता याच्या बँक खात्यातील २४ कोटींची रक्कम जप्त केली आहे. तुषार गुप्ताला जुलै महिन्यात पोलिसांनी अटक केली होती. दोन महिन्यांनी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
आतापर्यंत ३३ जणांना अटक nवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, मागच्या वर्षी जूनमध्ये नोएडा पोलिसांनी ३३ जणांना अटक केली. या सर्वांचा या टॅक्सचोरी रॅकेटमध्ये सहभाग आहे. यातील एकालाही अद्याप जामीन मिळालेला नाही. याप्रकरणी तपास सुरू असून, आणखी काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.nमागच्या वर्षी १ जून रोजी पोलिसांनी कोट्यवधींची करचोरी करणाऱ्या संशयितांचा भंडाफोड केला होता. हे टोळके बनावट ओळखपत्रांच्या आधारे बोगस कंपन्यांची नोंदणी करीत असे. या कंपन्यांचा वापर इ-वे बिल बनविण्यासाठी केला जात असे.
कसे फसविले?nअटक करण्यात आलेल्या करोडपती उद्योगपतीचे नाव तुषार गुप्ता (वय ३९) असे आहे. तो दिल्लीत तिलकनगर येथे राहणारा आहे. nतो एक पॅकेजिंग कंपनी चालवित होता. त्यानेच करचोरी करण्यासाठी तब्बल ३५ डमी कंपन्या स्थापन केल्या होत्या. nया कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक करीत त्याने इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता. यामुळे सरकारचे तब्बल २४ कोटींचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी कारवाई करून त्याच्या बँक खात्यांतून ही सर्व रक्कम जप्त केली आहे.