Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाबंदीनंतर लघुउद्योगातील 35 टक्केंनी गमावल्या नोकऱ्या

नोटाबंदीनंतर लघुउद्योगातील 35 टक्केंनी गमावल्या नोकऱ्या

500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर 35 टक्के कामगारांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत

By admin | Published: January 10, 2017 04:41 PM2017-01-10T16:41:38+5:302017-01-10T16:41:38+5:30

500 आणि 1 हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर 35 टक्के कामगारांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत

35 percent lost jobs in small scale after Nomination | नोटाबंदीनंतर लघुउद्योगातील 35 टक्केंनी गमावल्या नोकऱ्या

नोटाबंदीनंतर लघुउद्योगातील 35 टक्केंनी गमावल्या नोकऱ्या

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, 10 - 500 आणि  हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर लघुउद्योगातील 35 टक्के कामगारांना नोकऱ्या गमावाव्या लागल्या आहेत. तसेचं कामगारांच्या महसूलातही 50 टक्केंनी घट झाली आहे. ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशनने काल ही आकडेवारी जाहीर केली आहे. नोटाबंदीवर ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशनचा हा तिसरा अभ्सास आहे. लवकरच चौथा अहवालही संस्था प्रसिद्ध करणार आहे.
 
नोटाबंदीनंतर 34 दिवसांत लघु उद्योगात काम करणाऱ्या 35 टक्केंना आपली नोकरी गमावावी लागली आहे. मार्च 2017 पर्यंत 60 टक्के लोकांची नोकरी तसेच 55 टक्के महसूलात घट होण्याची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Web Title: 35 percent lost jobs in small scale after Nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.