लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ट्रॅव्हलट्रँगल या भारतातील सर्वात मोठ्या व वेगाने विकसित होणाऱ्या बाजारपेठेने प्रति युनिट आर्थिक नफा (मार्केटिंग, पेमेंट गेटवे, सपोर्ट आणि आॅपरेशन्स खर्च वजा केल्यानंतर प्रती व्यवहारावर उत्पन्न) कमावण्याचा मापदंड प्रस्थापित केला आहे. मार्च २०१७ पर्यंत ३५० कोटी रुपयांची ग्रॉस मार्जिनल व्हॅल्यू कमावली आहे. कंपनी जून २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसह सहा प्रदेशांत कॉन्ट्रिब्युशन मार्जिन नेट मार्केटिंग (सीएमएनएम) सक्रिय झाली आहे. एप्रिल २०१७ मध्ये ट्रॅव्हलट्रँगलने बाजारपेठेतील सर्व प्रदेशांत युनिट आर्थिक नफा कमावला आहे.ट्रॅव्हलट्रँगलकडे ४०० पेक्षा जास्त कर्मचारी असून, जगभरता ६५० हून अधिक तज्ज्ञांचे जाळे कार्यरत आहे. कंपनीने दरमहा संकेतस्थळाला भेट देणाऱ्या २० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना सेवा दिली आहे.
ट्रॅव्हलट्रँगलचा ३५० कोटांच्या जीएमव्हीचा टप्पा
By admin | Published: June 06, 2017 4:30 AM