Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘आयआयटी’ची ३८% मुले बेकार, ‘एआय’ने गिळल्या शेकडो नोकऱ्या 

‘आयआयटी’ची ३८% मुले बेकार, ‘एआय’ने गिळल्या शेकडो नोकऱ्या 

प्लेसमेंट हंगाम संपला तरीही हजाराे पदवीधर तरुण राहिले बेकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:38 PM2024-05-25T13:38:04+5:302024-05-25T13:38:59+5:30

प्लेसमेंट हंगाम संपला तरीही हजाराे पदवीधर तरुण राहिले बेकार

38% of IIT students unemployed, hundreds of jobs swallowed by AI  | ‘आयआयटी’ची ३८% मुले बेकार, ‘एआय’ने गिळल्या शेकडो नोकऱ्या 

‘आयआयटी’ची ३८% मुले बेकार, ‘एआय’ने गिळल्या शेकडो नोकऱ्या 

नवी दिल्ली : भारतातील ‘आयआयटी’ या जगातील सर्वाेत्तम शैक्षिणक संस्थांमध्ये गणल्या जातात. तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नाेकऱ्यांची सर्वत्र चर्चा रंगते. डिग्री हातात येण्यापूर्वी ‘आयआयटीयन्स’च्या हातात जाॅब असताे; मात्र यावेळी चित्र वेगळे आहे. प्लेसमेंटचा हंगाम संपला तरीही देशातील सर्व आयआयटीतील सुमारे ३८ टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेट मिळाले नाही. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे ‘एआय’ असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सुमारे ७००० विद्यार्थ्यांना नाेकरी मिळाली नाही. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी धीरज सिंह यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागविलेल्या माहितीतून ही बाब उजेडात आली आहे. 

३,४०० विद्यार्थ्यांना दाेन वर्षांपूर्वी प्लेसमेंट मिळाली नव्हती 
७,००० पर्यंत हा यंदाचा आकडा. 
१.२ पट वाढ प्लेसमेंटमध्ये नाेंदणीमध्ये झाली. 
२ पट वाढ प्लेसमेंट न मिळणाऱ्यांच्या संख्येत झाली.

किती जणांना मिळाली नाही नाेकरी?
वर्ष    नाेंदणी    नाेकरी मिळाली    नाेकरी नाही
२०२२    १७,९००    १४,४९०    १९ टक्के
२०२३    २०,०००    १५,८३०    २१ टक्के
२०२४    २१,५००    १३,४१०    ३८ टक्के

नव्या संस्थांत स्थिती
- ५,१०० नव्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नाेंदणी केली.
- २,०४० विद्यार्थ्यांना नाेकरी मिळाली नाही.
- ३.८ पट वाढ नाेकरी न मिळणाऱ्यांच्या संख्येत झाली आहे.
- १.३ पट प्लेसमेंटसाठी नाेंदणीमध्ये वाढ झाली.

माजी विद्यार्थ्यांकडे मागितली मदत
आयआयटी दिल्लीने संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांकडे प्लेसमेंटसंदर्भात मदत मागितली आहे. तेथील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना अद्यापही नाेकरी मिळालेली नाही. 
आयआयटी, मुंबईमध्ये हा आकडा सुमारे २५० एवढा आहे. या संस्थेनेही माजी विद्यार्थ्यांकडे नाेकऱ्यांबाबत सहकार्य मागितले आहे.

कारण काय?
‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी ॲण्ड सायन्स’चे कुलगुरू व्ही. रामगाेपाल राव यांनी सांगितले की, सर्वत्र २० ते ३० टक्क्यांनी प्लेसमेंट घटल्या आहेत. हा ‘चॅटजीपीटी’सारखे ‘एआय’ आणि नव्या लँग्वेज माॅडेलसचा परिणाम आहे. याचा प्रभाव दिसत आहे.

Web Title: 38% of IIT students unemployed, hundreds of jobs swallowed by AI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.