Join us

₹२४ च्या शेअरमध्ये ३९००% ची तुफान तेजी, अजय देवगणकडे आहेत १ लाख शेअर्स; मिळतोय जबरदस्त रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:48 AM

Panorama Studios International Ltd: या कंपनीचे शेअर्समध्ये शुक्रवारी फोकसमध्ये होते. अजय देवगणकडे कंपनीचे १ लाख इक्विटी शेअर्स आहेत. कंपनीचे मार्केट कॅप १,३०१.८४ कोटी रुपये आहे.

Panorama Studios International Ltd: पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडचे शेअर्समध्ये शुक्रवारी फोकसमध्ये होते. शुक्रवारी कंपनीचा शेअर ८ टक्क्यांनी वधारून ९८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे एक करार आहे. कंपनीने 'धमाल ४' चित्रपटासाठी सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि मारुती इंटरनॅशनलसोबत ११३.८० कोटी रुपयांचा लाइन प्रॉडक्शन करार केला आहे. अजय देवगणकडे कंपनीचे १ लाख इक्विटी शेअर्स आहेत. कंपनीचे मार्केट कॅप १,३०१.८४ कोटी रुपये आहे.

शेअर्सची स्थिती

पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडचा शेअर शुक्रवारी ९७५.४० रुपयांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ८ टक्के आणि महिनाभरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा महिन्यांत हा शेअर २४५.०३ टक्क्यांनी वधारला. सहा महिन्यांपूर्वी शेअरचा भाव २८२ रुपये होता. YTD मध्ये पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडचे समभाग या वर्षी आतापर्यंत १६५ टक्क्यांनी वधारले आहेत. वर्षभरात हा शेअर २८० टक्क्यांनी वधारला तर, पाच वर्षांत हा शेअर ३,९३८.९२ टक्क्यांनी वधारला आहे. या दरम्यान त्याची किंमत २४ रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढली आहे. शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत १,०९४ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १९६ रुपये आहे.

कंपनीचा व्यवसाय

१९८० मध्ये स्थापन झालेली पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. विविध फिल्म स्टुडिओ, मीडिया, मनोरंजन आणि सामग्रीच्या निर्मिती तसंच वितरणावर कंपनीचा फोकस आहे. आपल्या इतिहासात पॅनोरमा स्टुडिओने ओंकारा, स्पेशल २६, दृश्यम आणि सिंघम सारख्या चित्रपटांसाठी व्यावसायिक यश आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. पॅनोरमा स्टुडिओज इंटरनॅशनल लिमिटेडचे संचालक मंडळाचे सदस्य शेअर स्प्लिटचा विचार करीत आहेत.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायशेअर बाजारअजय देवगण