सध्ये देशातील दूरसंचार कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्लॅन्स आणत आहेत. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलनं (Airtel) ग्राहकांची वाढती डेटाची मागणी पाहता काही खास प्लॅन्स ऑफर करण्यास सुरूवात केली आहे. या प्लॅनममध्ये ग्राहकांना रोज ३ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉलिंगसह एसएमएसचीही सुविधा देण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्या यासह आणखीही काही भन्नाट ऑफर्स जेत आहे. पाहूया काय आहेत या ऑफर्स.
जिओचा ३४९ रूपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच दररोज ३ जीबी डेटासह एकूण या पॅकसह ८४ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनसोबत कंपनी कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे. तसंच १०० एसएमएस आणि मोफच जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शनही या प्लॅनसोबत देण्यात येत आहे.
४०१ रूपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या ४०१ रूपयांच्या प्लॅनसोबत २८ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये कंपनी दररोज ३ जीबी डेटा ऑफर करते. या प्लॅनसोबत ग्राहकांना ६ जीबी अतिरिक्त डेटाही देण्यात येतो. तसंच १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रीप्शनही देण्यात येतं. या प्लॅनसोबत ग्राहतांना डिज्ने + हॉटस्टारचंही सबस्क्रिप्शन मिळतं.
एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लॅन
या प्लॅनसोबत ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मइळते. तसंच दररोज १०० एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात येते. या प्लॅनसोबत ग्राहकांना ३० दिवसांसाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ मोबाईलचं सबस्क्रिप्शनचं ट्रायल मिळतं. याशिवाय एअरटेल एक्स्ट्रिम, विंक म्युझीकचंही सबस्क्रिप्शन मिळतं.
एअरटेलचा ४४८ रूपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा प्लॅनदेखील २८ दिवसांच्या वैधतेसह आणि दररोज ३ जीबी ड़ेटा ऑफर करतो. रोज १०० एसएमएस मोफत मिळणाऱ्या या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. या प्लॅनसोबत ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम प्रिमिअमसह, विंक म्युझीकचंही मोफत अॅक्सेस मिळतं. या प्लॅनसोबत कंपनी ग्राहकांना एका वर्षासाठी डिज्ने + हॉटस्टारचंही सबस्क्रिप्शन देण्यात येतं.