Join us

तिजाेरी फुल्ल; तरी पेट्राेल स्वस्त हाेईना!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 6:00 AM

तब्बल ६९ हजार काेटी रुपये कमावूनही पेट्राेल-डिझेलचे दैनंदिन दर कमी करण्यास विराेध

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा सरकारी तेल कंपन्यांना माेठा फायदा झाला आहे. चालू आर्थिक वर्षात गेल्या ९ महिन्यांमध्ये तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्राेलियम आणि हिंदुस्तान पेट्राेलियम यांनी तब्बल ६९ हजार काेटी रुपयांचा निव्वळ नफा कमाविला आहे. तेल कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलचे दर दरराेज बदलण्यास सुरूवात करण्याच्या मागणीला विराेध केला आहे. तसेच कच्चे तेल स्वस्त झाल्याचा लाभ ग्राहकांना देण्यासही कंपन्यांनी विराेध केला आहे. 

तेल संकटातील ताेटा भरुन निघलेला आहे. तेल कंपन्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीतून ही आकडेवारी समाेर आली आहे. तेल संकट निर्माण हाेण्यापूर्वीच्या कालावधीपेक्षा कंपन्यांचा यंदाचा नफा बराच जास्त आहे. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ३९,३५६ काेटी रुपयांचा नफा झाला हाेता. 

२२ महिन्यांपासून किमती स्थिरnपेट्राेल आणि डिझेलचे दर ६ एप्रिल २०२२पासून स्थिर आहेत. त्यावेळी युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले हाेते. त्यामुळे केंद्र सरकारने उत्पादन शुल्क घटविले हाेते. n१७.४ रुपये पेट्राेलवर आणि २७.७ रुपये प्रतिलिटर डिझेलवर ताेटा जून २०२२पर्यंत झाला हाेता.nकच्च्या तेलाचे दर त्यानंतर घटले हाेते. रशियाकडूनही स्वस्तात तेल आयात केले हाेते.n११ रुपये पेट्राेलवर आणि ६ रुपये प्रतिलिटर डिझेलवर नफा मिळाला. त्यामुळे कंपन्यांचे नुकसान भरून निघाले हाेते.

रशियन तेलाची आयात घटलीnआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असताना भारताला रशियाकडून जवळपास निम्म्या दराने तेल पुरवठा झाला. त्यामुळे रशियाकडून विक्रमी तेल खरेदी भारताने केली.nआता त्यात घट हाेताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात भारताने दरराेज सरासरी १२ लाख बॅरल एवढा कच्च्या तेलाची आयात केली. ही गेल्या १२ महिन्यातील नीचांकी आहे.

कंपन्यांचा दरकपातीस विराेध का?पेट्राेल डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती स्वेच्छेने स्थिर ठेवल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती सध्या खूप अस्थिर आहेत. गेल्या आर्थिक वर्षात झालेला ताेटा अद्याप भरून निघालेला नाही. त्यामुळे सध्या पूर्वीप्रमाणे दरराेज दर बदलण्यास सुरूवात करु नये असे कंपन्यांनी म्हटले आहे. 

१३.२ लाख बॅरल एवढी कच्च्या तेलाची दरराेजची आयात डिसेंबर २०२३मध्ये झाली.

१६.२ लाख बॅरल एवढी सरासरी दैनंदिन आयात नाेव्हेंबर २०२३मध्ये झाली. 

२१  लाख बॅरल एवढी दैनंदिन आयात जून २०२३ मध्ये झाली हाेती. हा आयातीचा उच्चांक हाेता.

 

टॅग्स :पेट्रोलपेट्रोल पंप