नवी दिल्ली : जलवायू परिवर्तनामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी जगभरातील देशांनी कोळसा आधारित वीजनिर्मिती प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वाधिक फटका चीन आणि भारतातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे २०३५ पर्यंत भारतातील ४ लाखाहून अधिक खाण कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे.
अमेरिकेतील ‘ग्लोबल एनर्जी मॉनिटर’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने दरवर्षी जगभरातील ऊर्जास्थितीचा आढावा घेतला जातो. या संस्थेने जारी केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. कोळसा उत्पादन कमी केल्याने जगभरात खाण क्षेत्रातील सुमारे ९,९०,२०० जणांच्या नोकऱ्या जातील. ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ३७ टक्के इतकी आहे, असे हा अहवाल सांगतो.