India Vs. Pakistan T20 WC : गेल्या वर्षी भारतात झालेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी सुमारे ३० लाख रुपये मोजावे लागले होते. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महास्पर्धेसाठी चांगली तयारी केली होती. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रोमहर्षक सामना पार पडला.
अवघ्या तीन महिन्यांत हे स्टेडियम बांधण्यात आलं आहे. यात लास वेगासमधील फॉर्म्युला वन ग्रांप्री कॉम्प्लेक्समधील मॉड्युलर स्टँडचा वापर करण्यात आला आहे. टी २० विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे. कॅरेबियन देशांमध्येही सामने आयोजित करण्यात आलेत.
अॅड स्लॉटची किंमत किती?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच खास असतो. हा सामनाही खास होता, कारण गुरुवारी अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत करून जगाला आश्चर्यचकित केलं. स्पोर्ट्स व्हॅल्युएशन फर्म डी अँड पी अॅडव्हायजरीचे मॅनेजिंग पार्टनर संतोष एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्याच्या जाहिरात स्लॉटसाठी १० सेकंदासाठी ४० लाख रुपयांपर्यंत (सुमारे ४८,००० डॉलर) खर्च येण्याची शक्यता वर्तवली.
तसंच भारताच्या सामन्यादरम्यान १० सेकंदाच्या सरासरी अॅड स्पेससाठी २० लाख आणि त्याउलट ३० सेकंदाच्या बाऊल अॅडसाठी ६५ लाख डॉलर्सचा खर्च होत असल्याचं त्यांनी सांगितलं. २०२२ फुटबॉल वर्ल्ड कपदरम्यान ब्रिटनमध्ये ३० सेकंदाच्या जाहिरातीची किंमत ४,००,००० पौड्स होती असंही ते म्हणाले.
कोणते दिग्गज स्पॉन्सर?
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी स्पर्धेला स्पॉन्सर केलं आहे. यामध्ये सौदी अरामको, कोका-कोला आणि अमिराती समूहाचा समावेश आहे. ही स्पर्धा महिनाभर चालणार आहे. याशिवाय दक्षिण आशियाई देशांच्या प्राईम व्ह्यूइंग टाईम्समध्ये ही मॅच आयोजित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, रविवारी जेव्हा भारतात रात्रीची वेळ असते, तेव्हा भारत-पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमध्ये सकाळी १०.३० वाजता सुरू होतो.
गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीसाठी अंदाजे ३० लाख रुपयांची आवश्यकता होती. दरम्यान, Adobe Inc. चे शंतनू नारायण आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे सत्या नडेला तसंच व्हॉट्सअॅपचे माजी कार्यकारी नीरज अरोरा यांनी अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये गुंतवणूक केली आहे. ही लीग ट्वेंटी-२० प्रमाणेच २० षटकांच्या शैलीत खेळली जाते. या लीगचा पहिला सामना गेल्या वर्षी टेक्सासमध्ये झाला होता. अमेरिकेतील भारतीयांचं सरासरी उत्पन्न सुमारे १,२०,००० डॉलर आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत गटांपैकी एक आहेत.