Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनरेगाच्या मजुरीत चार ते दहा टक्के वाढ, महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मिळतेय मजुरी

मनरेगाच्या मजुरीत चार ते दहा टक्के वाढ, महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मिळतेय मजुरी

महाराष्ट्रात मजुरी दर आता २९७ रुपये प्रतिदिन झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:39 AM2024-03-29T11:39:25+5:302024-03-29T11:39:50+5:30

महाराष्ट्रात मजुरी दर आता २९७ रुपये प्रतिदिन झाला आहे.

4 to 10 percent increase in MNREGA wages, wages are getting Rs. 297 per day in Maharashtra | मनरेगाच्या मजुरीत चार ते दहा टक्के वाढ, महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मिळतेय मजुरी

मनरेगाच्या मजुरीत चार ते दहा टक्के वाढ, महाराष्ट्रात २९७ रुपये प्रतिदिन मिळतेय मजुरी

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत विविध राज्यांमध्ये मजुरीचे दर सुधारित करण्यात आले असून, चार ते १० टक्के वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मजुरी दर आता २९७ रुपये प्रतिदिन झाला आहे.

आम्ही ४०० रुपये मजुरी देणार : राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, मनरेगात मजुरी ७ रुपयांनी वाढविण्यात आली असतानाही ते आता तुम्हाला इतक्या मोठ्या रकमेचे काय कराल असे विचारतील. ते आता धन्यवाद मोदी नावाची मोहीमही सुरू करतील. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक मजुराची दिवसाची मजुरी ४०० रुपये करणार आहे.

मनरेगाचे राज्यनिहाय दर (प्रतिदिन रुपयांत) 
राज्य    मजुरी    हरयाणा        ३७४
अरुणाचल प्रदेश        २३४
महाराष्ट्र        २९७
नागालँड        २३४
सिक्कीम        ३७४
गोवा        ३५६
आंध्र प्रदेश        ३००
उत्तर प्रदेश        २३७
उत्तराखंड        २३७
पश्चिम बंगाल        २५०
तामिळनाडू        ३१९
तेलंगणा        ३०० 
बिहार        २२८
गुजरात        २८०
कर्नाटक        ३४९

देशातील एकूण बेरोजगारांपैकी ८३ टक्के तरुण का आहेत? वर्षाला २ कोटी नोकऱ्या कुठे आहेत? देशात ३० लाख सरकारी पदे का रिक्त आहेत? प्रत्येक परीक्षेचा पेपर का फुटतो? व्यावसायिकांचे १६ लाख कोटी माफ झाले मग  शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या का करत आहेत? 
-  प्रियांका गांधी,  महासचिव, काँग्रेस

Web Title: 4 to 10 percent increase in MNREGA wages, wages are getting Rs. 297 per day in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.