लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : स्पाइसजेट ही विमान कंपनी अमेरिकेच्या बोइंगकडून बी-७३७ मॅक्स या प्रकाराची ४० विमाने खरेदी करणार आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. कंपनीने सांगितले की, हा व्यवहार ४.७ अब्ज डॉलरचा आहे. यात २० नव्या ७३७ मॅक्स १० विमानांचा समावेश आहे. कंपनीकडील ७३७ मॅक्स ८ या प्रकाराच्या २० विमानांचे नव्याने रूपांतरण करण्यात येईल. स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंह यांनी सांगितले की, ७३७ मॅक्स १० लाँच केल्यामुळे खर्चात कपात आणि महसूल वाढविण्यात मदत होईल.
स्पाइसजेट घेणार ४0 बोइंग विमाने
By admin | Published: June 22, 2017 1:36 AM