Lokmat Money > बिझनेस न्यूज > 4300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी राणा कपूरांच्या पत्नीने ९ महिन्यांच्या बाळाला दिले ४० कोटींचे गिफ्ट!  

4300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी राणा कपूरांच्या पत्नीने ९ महिन्यांच्या बाळाला दिले ४० कोटींचे गिफ्ट!  

bungalow gift : ३१ जुलै २०२१ रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी करण्यात आली आहे. ही प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून नोंदणीकृत झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 12:10 PM2021-08-21T12:10:46+5:302021-08-21T12:19:32+5:30

bungalow gift : ३१ जुलै २०२१ रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी करण्यात आली आहे. ही प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून नोंदणीकृत झाली आहे.

40 crore rupees bungalow gift rana kapoor 9 month old grandson got from bindu kapoor | 4300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी राणा कपूरांच्या पत्नीने ९ महिन्यांच्या बाळाला दिले ४० कोटींचे गिफ्ट!  

4300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी राणा कपूरांच्या पत्नीने ९ महिन्यांच्या बाळाला दिले ४० कोटींचे गिफ्ट!  

नवी दिल्ली  : येस बँकेचे (Yes Bank) संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर (Rana Kapoor) यांच्या पत्नी बिंदू राणा कपूर (Bindu Rana Kapoor) यांनी आपला ९ महिन्यांचा नातू अशिव खन्ना याला ४० कोटी रुपयांची प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून दिली आहे. ही प्रॉपर्टी दिल्लीतील जोरबाग या परिसरात आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, Zapkey.com दिलेल्या नोंदणी कागदपत्रांद्वारे हे समोर आले आहे.

Zapkey.com द्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, ३१ जुलै २०२१ रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी करण्यात आली आहे. ही प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून नोंदणीकृत झाली आहे. यासाठी राणा कपूर यांच्या पत्नीने ३६.९० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी (stamp duty) भरली आहे. हे गिफ्ट अशिव खन्नाची आई राधा कपूर खन्ना यांच्याद्वारे ३६.९० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी अशिव खन्ना याच्यावतीने भरण्यात आली आहे.

३६९ चौरस मीटर फ्लॅट
गिफ्ट देण्यात आलेली प्रॉपर्टी दक्षिण दिल्लीतील जोरबाग भागात आहे. यामध्ये तळमजल्यावर २ बीएचके फ्लॅट आहे. तसेच पार्किंग स्लॉट आणि इतर काही सुविधा आहेत. फ्लॅटचे क्षेत्रफळ ३६९ चौरस मीटर आहे. प्रॉपर्टीचे अंदाजे बाजारमूल्य जवळपास ४०-४४ कोटी रुपये आहे. 

Zapkey.com द्वारे दिलेल्या कागदपत्रांनुसार, याच भागातील आणखी एक प्रॉपर्टी यावर्षी २४ जुलै रोजी ४३.५ कोटी रुपयांना विकली गेली होती. दरम्यान, २००४ मध्ये राणा कपूर यांच्या पत्नीला आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीचा एक हिस्सा वारसाहक्काने मिळाला होता, असे कागदपत्रांवरून समोर आले होते.

राणा कपूर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप 
लीगल एक्सपर्ट्सच्या मते, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला गिफ्ट म्हणून काहीही देऊ शकता. प्रॉपर्टीच्या बाबतीत ती ट्रान्सफर करणे आवश्यक असते. दरम्यान, १ जुलै रोजी मनी लाँन्ड्रिग प्रकरणी कोर्टाने राणा कपूर यांचा जामीन फेटाळून लावला होता. राणा कपूर यांच्यावर येस बँकेत ४३०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Web Title: 40 crore rupees bungalow gift rana kapoor 9 month old grandson got from bindu kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.