Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय

एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय

फेसबुकच्या एका निर्णयामुळे त्यांची कंपनी रातोरात बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:41 PM2023-09-26T15:41:23+5:302023-09-26T15:44:26+5:30

फेसबुकच्या एका निर्णयामुळे त्यांची कंपनी रातोरात बंद झाली.

40 crores company sunk in one night did not give up Now set up 10 times bigger business success story of stage ott platform | एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय

एका रात्रीत बुडाली ४० कोटींची कंपनी, हार मानली नाही; आता उभा केला १० पट मोठा व्यवसाय

जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यशाचं शिखर नक्कीच गाठता येतं. दिवसरात्र कठोर परिश्रम करून काहींनी कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. पण एका रात्रीत जर पूर्ण व्यवसायच बुडाला असं जर तुम्हाला सांगितलं तर? एका रात्रीत अक्षरश: सर्वकाही संपलं. सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तीनं यानंतरही हार मानली नाही आणि आता पूर्वीपेक्षा १० पट मोठी कंपनी उभी केली. व्हायरल कंटेंट तयार करणाऱ्या तीन मुलांची ही कहाणी आहे. विनय सिंघल, प्रवीण सिंघल आणि शशांक वैष्णव अशी या तिघांची नावं आहेत.
व्हायरल कंटेंट तयार करणाऱ्या तीन मुलांनी मोठं यश मिळवलंय. विनय आणि प्रवीण हे हरियाणातील भिवानी येथील रहिवासी आहेत, तर शशांक हे मध्य प्रदेशातील इंदूरजवळचे रहिवासी आहेत.

कॉलेजनंतर उभी केली ४० कोटींची कंपनी
कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताच २०१४ मध्ये, या तीन मुलांनी व्हायरल कंटेंटसाठी स्वतःचा नवीन प्लॅटफॉर्म तयार केला. एक व्हायरल कंटेंट प्लॅटफॉर्म जो देशात आणि जगात प्रसिद्ध झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचं नाव होते WittyFeed. हे Facebook वरील एक पेज होतं ज्यानं लोकांसाठी मजेदार आणि इंटरेस्टिंग कंटेंट शेअर करत होता. त्यांची कंपनी जागतिक स्तरावर होती आणि त्यावेळी त्यांची अनेक ठिकाणी कार्यालयं होती. त्यांच्या कंपनीत १२५ लोक काम करत होते आणि त्यांना जवळपास ४० कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी फेसबुकनं कोणतीही सूचना न देता त्याचे पेज ब्लॉक केलं, क्षणार्धात त्याची कंपनी गायब झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. 

उभी केली ३०० कोटींची कंपनी
सर्वकाही संपलं होतं. परंतु हार मानली नाही, कठीण काळातही त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांपर्यंतचा पगार दिला, असं विनय यांनी सांगितलं. काही महिन्यांनंतर STAGE ची आयडिया आली. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना साथ देण्याची विनंती केली. कर्मचाऱ्यांनीदेखील त्यानंतर त्यांना साथ दिली. १ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत स्टेज अॅप लाँच केलं. आज कंपनीचं व्हॅल्युएशन ३०० कोटींपेक्षा अधिक आहे.

अशी सूचली कल्पना
२०१९ च्या आसपास ओटीटीची लोकप्रियता वाढू लागली होती. जेव्हा हरयाणवी ओटीटी प्लॅटफॉर्म सर्च केला तेव्हा त्या काही सापडलं नाही. त्याचवेळी स्टेजची सुरुवात झाली. आम्ही लोकल भाषेत वेब सीरिज तयार करण्याचं काम सुरू केलं. याशिवाय अॅपवरून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. स्टेज हा देशातील भाषांमधील महिला ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. त्याला हरयाणाचा नेटफ्लिक्स असंही म्हणतात.

Web Title: 40 crores company sunk in one night did not give up Now set up 10 times bigger business success story of stage ott platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.