Join us

३.५ मिनिटांचे आश्वासन पडणार ४० काेटींना, कंपनीवर महिलेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 6:49 AM

चीजचा वापर करण्यात येणाऱ्या मॅक्राेनीबाबत कंपनीने दावा केला हाेता, की केवळ साडेतीन मिनिटांत ती तयार हाेते.

वाॅशिंग्टन : साडेतीन मिनिटांत मॅक्राेनी तयार झाली नाही, म्हणून एका महिलेने उत्पादक कंपनीवर तब्बल ५० लाख डाॅलर म्हणजे, सुमारे ४० काेटी रुपयांचा खटला दाखल केला आहे. उत्पादन विक्रीसाठी सर्वच कंपन्या विविध प्रकारची आश्वासने देतात. मात्र, मॅक्राेनी बनविणाऱ्या या कंपनीविराेधात आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. 

चीजचा वापर करण्यात येणाऱ्या मॅक्राेनीबाबत कंपनीने दावा केला हाेता, की केवळ साडेतीन मिनिटांत ती तयार हाेते. मात्र, महिलेने हा दावा खाेटा असल्याचे म्हटले आहे. अमांडा रमीरेज असे महिलेचे नाव असून त्या अमेरिकेच्या फ्लाेरिडा येथे राहतात. त्या म्हणाल्या, की मॅक्राेनी बनविण्यासाठी साडेतीन मिनिटांपेक्षा खूप जास्त वेळ लागला. कंपनीने दिलेल्या वेळेत तर मॅक्राेनी शिजलीदेखील नव्हती.  कंपनीने फसवी जाहिरात केली असून मॅक्राेनी बनविण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात, असा त्यांचा आराेप आहे. अमांडा यांनी केलेल्या आराेपांचा बचाव न्यायालयात करू, असे कंपनीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :जाहिरातन्यायालय