Join us

सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 2:16 PM

China Biggest Gold Reserves: सोने आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये माणसांचा रस अनेक शतकांपासून आहे. आता यांच्या हाती मोठा कुबेराचा खजाना लागला आहे.

China Biggest Gold Reserves: सोने आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये माणसांचा रस अनेक शतकांपासून आहे. आता शेजारी देश चीनच्या हाती कुबेराचा खजिना लागलाय. चीननं नुकताच आपल्या हुनान प्रांतात सोन्याचा मोठा साठा शोधून काढला आहे. इथं इतकं सोनं आहे की, चीनच्या अर्थव्यवस्थेत पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळू शकते. सोन्याचा हा अफाट साठा मिळाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कोणते बदल पाहायला मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जाणून घेऊया या खाणीत किती सोनं आहे?

या शोधाचा जागतिक सोन्याच्या उत्पादनावर आणि जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ शकतो. भूगर्भशास्त्रज्ञांना चीनच्या हुनान प्रांतातील पिंगजियांग काउंटीच्या वांगू भागात सोन्याचा हा मोठा साठा सापडला. ही खाण दोन हजार मीटरपेक्षा जास्त खोलीवर सापडली असून, तेथे ४० हून अधिक सोन्याचे खाणी सापडल्या आहेत. प्राथमिक संशोधनानुसार येथे सुमारे ३००.२ टन सोनं असू शकते.

६९,३०,६२,३६,००,००० रुपयांचं सोनं

चीनच्या हुनान प्रांताच्या ब्युरो ऑफ जिओलॉजीनं दिलेल्या आकडेवारीनुसार या खाणीतील सोन्याची किंमत जवळपास ६९,३०,६२,३६,००,००० रुपये आहे.तज्ज्ञांच्या मते तीन हजार मीटरपेक्षा जास्त खोलीवर सोन्याचा साठा एक हजार टनांपर्यंत पोहोचू शकतो. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत चीनचा सोन्याचा साठा २,२६४.३२ टनांवर पोहोचला आहे. हा आकडा नोव्हेंबर २०२२ च्या तुलनेत ३१४ टनांनी अधिक आहे.

या बाबतीत चीन पुढे!

जगातील सोन्याच्या प्रमुख उत्पादकांमध्ये तीव्र स्पर्धात्मक वातावरण आहे. परंतु वांगुओ साइटचा शोध चीनच्या प्रगत भूगर्भशास्त्र आणि खाण तंत्राचं प्रतिबिंब आहे. कारण एवढ्या खोलीवर सोन्याचा शोध घेणं साधी बाब नाही. चीनच्या या कृतीमुळे जगभरातील भूगर्भशास्त्रज्ञांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. यामुळे अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या बड्या सोनं उत्पादक देशांसाठी स्पर्धात्मक वातावरण तयार होऊ शकतं.

टॅग्स :सोनंचीन