- चिन्मय काळे
मुंबई - धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांच्या खरेदीला महत्त्व असते. यापैकी हिºयांच्या दागिन्यांचा विचार केल्यास ग्राहकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. देशभरातील ४० टक्के हिरे अप्रमाणित असल्याचे इंटरनॅशनल जेमॅकोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या (आयजीआय) माहितीत समोर आले आहे.
आयजीआय ही हिºयांचे प्रमाणीकरण करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. हिºयांच्या प्रत्येक पैलूची तपासणी करुन त्यांचे ‘ग्रेडिंग’ करण्यासाठी संस्थेच्या जगभरात २३ प्रयोगशाळा आहेत. यापैकी १५ प्रयोगशाळा भारतात आहेत. त्यातील सर्वात मोठी प्रयोगशाळा येथील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात आहे. या प्रयोगशाळेत अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे हिºयांची तपासणी होती.
याबाबत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक टेहमॅस्प प्रिंटर व आयजीआयचे महाव्यवस्थापक रमित कपूर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, भारतात हिºयांचा बाजार जगभराच्या तुलनेत कमी आहे. पण जगात वापरल्या जाणाºया १० पैकी ८ हिºयांवर भारतात पैलू पाडले जातात. यामुळेच भारत हिरे निर्यातीत जगात अग्रस्थानी आहेत. हिºयांची कापणी करणे, त्याला आकार देणे, त्याला चमक देणे यामध्ये भारतीय कारागिरांइतके सर्वोत्तम काम जगात दुसरे कोणीच करीत नाही. यामध्ये आधी बेल्जियम जगात सर्वोत्तम होते. त्यामुळेच आयजीआयची स्थापनासुद्धा बेल्जियमची राजधानी अॅन्टवर्प येथे झाली. पण आज भारतीय कारागिरांनी या क्षेत्रात बेल्जियमलासुद्धा मागे टाकले आहे. यामुळेच संस्थेच्या सर्वाधिक प्रयोगशाळा भारतात आहेत. याद्वारे ५५० जेमॅटोलॉजिस्ट देशभरात कार्यरत आहेत. युवक-युतींसाठी हे हा करिअरचा एक चांगला मार्गसुद्धा ठरत आहे. एकूणच देशातील हिरे बाजार यामुळे संघटित आहे, असे संस्थेचे म्हणणे आहे.
८० टक्के निर्यात भारतातून
जगाला लागणाºया ८० टक्के हिºयांची निर्यात भारतातून होत असल्याने आयजीआयच्या देशभरातील १५ प्रयोगशाळांमध्ये रोज ४ लाख हिºयांचे प्रमाणिकरण होते. तर महिनाकाठी हिºयांच्या २ लाख दागिन्यांचे प्रमाणीकरण होते. भारतीय बाजारातही हिरे हे हळूहळू सोन्याला पर्याय ठरत आहेत. त्यामुळेच हिºयांचे प्रमाणीकरण करण्याचे प्रमाण २५ टक्के वाढले आहे. पण अद्यापही ४० टक्के बाजार अप्रमाणित आहे, असे रमित कपूर यांनी सांगितले.
४० टक्के हिरे अद्यापही अप्रमाणित, रोज ४ लाख हिऱ्यांचे प्रमाणीकरण
धनत्रयोदशीच्या दिवशी दागिन्यांच्या खरेदीला महत्त्व असते. यापैकी हिºयांच्या दागिन्यांचा विचार केल्यास ग्राहकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. देशभरातील ४० टक्के हिरे अप्रमाणित असल्याचे इंटरनॅशनल जेमॅकोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या (आयजीआय) माहितीत समोर आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:42 AM2018-11-05T06:42:36+5:302018-11-05T06:43:02+5:30