नवी दिल्ली : भारतीयांमध्ये क्रेडिट कार्ड वापरण्याची क्रेझ दिसून येते. त्याचे प्रत्यंतर नोव्हेंबरमध्ये क्रेडिट कार्ड सेवा देणाऱ्या संस्थांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत क्रेडिट कार्डाने होणाऱ्या खर्चात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाली.
एकट्या नोव्हेंबरमध्ये युजर्सनी या कार्डांद्वारे १.६ लाख कोटींचा खर्च केला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये क्रेडिट कार्डच्या खर्चात घट झाली आहे.
युजर्सकडून बँकनिहाय किती वापर?
एसबीआय क्रेडिट कार्डवरील एकूण खर्च वर्षाला ५० टक्क्यांनी वाढून ३,१४,५८९ कोटींवर पोहोचला. एसबीआय एकूण कार्डांची संख्या १.८३ कोटींवर पोहोचली आहे. क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये एसबीआयचा वाटा १९.६ टक्के इतका राहिला. तर एचडीएफसी क्रेडिट कार्डचा एकूण खर्च २९ टक्क्यांनी वाढून ४२,१६५ कोटींवर पोहोचला. (वृत्तसंस्था)