नवी दिल्ली : तंबाखू उत्पादनावर ४० टक्के सिन टॅक्स (दुष्कृत्य) लावण्याचा प्रस्ताव ‘कन्झ्युमर व्हाइस’ या समूहाने जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेकडे केला आहे. या माध्यमातून व्यसनांना आळा घालण्याचा हा प्रयत्न आहे. विशेषत: देशातील गरीब आणि तरुणांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी हा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे.
देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. यावरील कर ४० टक्के केल्यास भारतातील लाखो लोकांना गंभीर आजारांपासून वाचवता येईल, असा यामागचा होरा आहे. जगभरात आतापर्यंत हेच सिद्ध झाले आहे की, तंबाखूजन्य पदार्थांवरील कर वाढवूनच याचा खप कमी करता येईल, असेही ‘कन्झ्युमर व्हाइस’ने म्हटले आहे.
तंबाखूजन्य पदार्थांच्या
करात वाढ केल्यास गर्भवती महिला आणि तरुणांमधील व्यसनांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा दावा करण्यात येत आहे. भारतात दरवर्षी तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या आजारातून एक लाख लोकांचा मृत्यू होतो. तर, भारतात दरवर्षी दोन ते तीन लाख नव्या कॅन्सर रुग्णांची यात भर पडते. जगातील वाढत्या रोगांनाही तंबाखूजन्य पदार्थ कारणीभूत ठरत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>महसुलापेक्षा आरोग्य महत्त्वाचे
01 लाख कोटी रुपये खर्च तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या रोगांवर देशात दरवर्षी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे
केले जातात. 2011 मधील ही आकडेवारी आहे. अर्थात ही रक्कम जीडीपीच्या १.१६ टक्के आहे. राष्ट्रीय आरोग्य खर्चाच्या २१ टक्के रक्कम ही तंबाखूमुळे
होणाऱ्या आजारावर खर्च केली जाते. तर, तंबाखूच्या महसुलातून सरकारला मिळणारे उत्पन्न हे आरोग्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाच्या
फक्त १७ टक्के आहे ‘कन्झ्युमर व्हाइस’चे मुख्य परिचालन अधिकारी असीम सान्याल म्हणाले की, सिगारेट, विडी, तंबाखू, पानमसाला यांसारख्या उत्पादनांवरचा कर वाढवून याचे व्यसन करणाऱ्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे. अन्य तंबाखू उत्पादनांप्रमाणेच विडीवरही कर लावला जावा, असे यात सुचविले आहे.
तंबाखू उत्पादनांवर लावा ४० टक्के कर!
तंबाखू उत्पादनावर ४० टक्के सिन टॅक्स (दुष्कृत्य) लावण्याचा प्रस्ताव ‘कन्झ्युमर व्हाइस’ या समूहाने जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेकडे केला आहे.
By admin | Published: October 17, 2016 05:11 AM2016-10-17T05:11:15+5:302016-10-17T05:11:15+5:30