Join us  

मध्यमवर्गीयांची पहिली कार, 'मारुती 800' कारचा 40 वर्षांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:51 AM

विशेष म्हणजे या कारची तेव्हा किंमत 52,500 रुपये एवढी होती. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी भारतीय विमानसेवेतील कर्मचारी हरपाल सिंग यांना पहिल्या कारची चावी दिली.

ठळक मुद्देसंजय गांधी यांनीही देशातील मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीतील कार लाँच करायचं ठरवलं. मात्र, सन 1980 च्या दशकात विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. पण, संजय गांधींचे हे स्वप्न तेथून तीन वर्षांनी सत्यात उतरलं.

नवी दिल्ली - टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटांनी देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांसाठी चारचाकी गाडीचं स्वप्न पाहिलं होतं. एका कुटुंबाचा चारचाकीतून सोयीस्कर प्रवास व्हावा, यासाठी त्यांनी पाहिलेलं स्वप्न नॅनो कारच्या माध्यमातून सत्यातही उतरवलं. मध्यमवर्गाला परवडेल अशी कार त्यांनी लाँचही केली, त्याला प्रतिसादही मिळाला. मात्र, त्यापूर्वीच म्हणजे जवळपास 1980 साली संजय गांधी यांनीही असंच स्वप्न पाहिलं होतं. विशेष म्हणजे ते स्वप्नही सत्यात उतरलं. पण, दुर्दैवाने ती कार पाहायला स्वत: संजय गांधी नव्हते.

संजय गांधी यांनीही देशातील मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीतील कार लाँच करायचं ठरवलं. मात्र, सन 1980 च्या दशकात विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. पण, संजय गांधींचे हे स्वप्न तेथून तीन वर्षांनी सत्यात उतरलं. पंतप्रधानइंदिरा गांधींच्या नेतृत्वात भारत सरकार आणि मारुती उद्योग समुहाने (मारुती सुझुकी) जॉईंट वेंचरमध्ये मारूतीची कार बाजारात उतरवली. देशातील औद्योगिकरणाला चालना देण्याचं काम या नव्या कंपनीने केलं. 9 एप्रिल 1983 रोजी बुकींग सुरू झाल्यापासून मारुती कंपनीकडे नागरिकांनी गर्दी केली होती. केवळ 2 महिन्यांतच 1.35 लाख कारचं बुकींगही झालं होतं. 

संजय गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजेच 14 डिसेंबर 1983 साली भारतात पहिली मारुती 800 कार अवतरली. विशेष म्हणजे या कारची तेव्हा किंमत 52,500 रुपये एवढी होती. तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी भारतीय विमानसेवेतील कर्मचारी हरपाल सिंग यांना पहिल्या कारची चावी दिली. या कारचा नंबर DIA 6479 असा होता. सन 2010 मध्ये हरपाल सिंग यांचं निधन झालं. त्यामुळे, या पहिल्या कारचा कोणी मालकच राहिला नाही. सध्या मारुती सर्व्हीस सेंटरने ही कार रिस्टोर केली आहे. 

Hindustan Ambassador और Premier Padmini यांसारख्या कारला टक्कर देण्यासाठी मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किंमतीत कंपनीने ही कार बाजारात आणली होती. Maruti 800 च्या पहल्या मॉडेलमध्ये 796 सीसी, 3 सिलिंडर F8D पेट्रोल इंजिन होते, जे आज Alto 800 और Omni या गाड्यांमध्ये दिसून येते. या इंजिनची खासियत म्हणजे मेंटनन्स खर्च अतिशय कमी होता. 

मारुती कंपनीने काळानुसार ग्राहकांच्या गरजा आणि आधुनिक स्पर्धा लक्षात घेऊन नव्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक फिचर्स आणि स्टायलिश लूकच्या गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. मारुतीची नवीन कार Future S concept वर आधारीत आहे. मारुतीने 2018 मध्ये ऑटो एक्स्पो स्वरुपात ही कार लाँच केली आहे. 

टॅग्स :मारुती सुझुकीइंदिरा गांधीकारपंतप्रधान