वाशिम : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी केंद्र सरकारने ४२ कोटी रुपयांच्या निधीस मंगळवारी मान्यता दिली. पहिल्या हप्त्याच्या उर्वरित निधीपोटी ही रक्कम उपलब्ध करण्यात आली आहे.
पिकांना बारमाही सिंचन करता यावे, यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान तत्वावर ठिबक आणि तुषार संच पुरविले जातात. याअंतर्गत केंद्र शासनाकडून ५० टक्के आणि राज्य शासनाकडून ५० टक्के निधी दिला जातो. त्यानुसार, केंद्र आणि राज्य शासन मिळून प्रत्येकी १७६.५० कोटी याप्रमाणे ३५३ कोटी रुपयांच्या रकमेस मान्यता मिळालेली आहे. गत १४ जुलै रोजी केंद्राने पहिल्या हप्त्यापोटी ४६.२५९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. या पहिल्या हप्त्याच्या ४२.१२२१ कोटी रुपयाच्या उर्वरित निधीस मंगळवारी वित्तीय मान्यता देण्यात आली. हा निधी २०१५-१६ या आर्थिक वर्षात बसविण्यात आलेल्या ठिबक व तुषार संचाकरिता वापरण्यात यावा, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
सूक्ष्म सिंचनासाठी ४२ कोटींचा निधी
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी केंद्र सरकारने ४२ कोटी रुपयांच्या निधीस मंगळवारी मान्यता दिली.
By admin | Published: November 25, 2015 11:24 PM2015-11-25T23:24:21+5:302015-11-25T23:24:21+5:30