Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन मजले, महिन्याचं भाडं ४२ लाख; रेव्हेन्यूही शेअर करावा लागणार, असं असेल पहिलं Apple स्टोअर; करारात या अटी

तीन मजले, महिन्याचं भाडं ४२ लाख; रेव्हेन्यूही शेअर करावा लागणार, असं असेल पहिलं Apple स्टोअर; करारात या अटी

Apple Store in India: आयफोन निर्माता कंपनी ॲपल देशात आपले पहिले स्टोअर उघडणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 02:49 PM2023-04-07T14:49:37+5:302023-04-07T14:51:56+5:30

Apple Store in India: आयफोन निर्माता कंपनी ॲपल देशात आपले पहिले स्टोअर उघडणार आहे. 

42 lakhs per month rent 3 floors for the first Apple store share revenue Here are the terms in the contract | तीन मजले, महिन्याचं भाडं ४२ लाख; रेव्हेन्यूही शेअर करावा लागणार, असं असेल पहिलं Apple स्टोअर; करारात या अटी

तीन मजले, महिन्याचं भाडं ४२ लाख; रेव्हेन्यूही शेअर करावा लागणार, असं असेल पहिलं Apple स्टोअर; करारात या अटी

आयफोन निर्माता कंपनी ॲपल देशात आपलं पहिले स्टोअर उघडणार आहे. मुंबईत हे स्टोअर सुरू होणार असून त्यासाठी कंपनीनं मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एका मॉलमध्ये तीन मजल्यांवर 20,000 चौरस फुटांहून अधिक जागा भाड्यानं घेतली आहे. प्रॉपस्टॅकनुसार, ॲपल यासाठी दरमहा किमान 42 लाख रुपये भाडे देईल, म्हणजेच किमान वार्षिक भाडं 5.04 कोटी रुपये असेल. तसंच दर तिमाहीत कंपनी भाडं भरेल. दर तीन वर्षांनी भाडं 15 टक्क्यांनी वाढणार आहे. भाडे करारांतर्गत रेव्हेन्यू वाटणीचीही तरतूद आहे. याअंतर्गत ॲपलला तीन वर्षांसाठी दोन टक्के आणि नंतर अडीच टक्के रेव्हेन्यू लागणार आहे. हा करार 25 फेब्रुवारी 2021 रोजी नोंदणीकृत झाला होता.

ॲपलचं पहिले स्टोअर जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये (Jio World Drive Mall) सुरू होणार आहे. या स्टोअरचं नाव Apple BKC असं असेल. हे स्टोअर ॲपल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं (Apple India Private Limited) भाडेतत्वावर घेतलं आहे आणि भाडेकरू इंडियन फिल्म कंबाईन प्रायव्हेट लिमिटेड (The Indian Film Combine Private Limited) असेल. कमर्शियल रियल्टी तज्ज्ञांच्या मते जिओ वर्ल्ड ड्राईव्ह (Jio World Drive) 5 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. यापैकी ॲपलनं तीन मजल्यांवर 7,014 चौरस फूट, 7,014 चौरस फूट आणि 6,778 चौरस फूट असे तीन मजल्यांवर 20,806 चौरस फूट क्षेत्र भाड्यानं घेतलं आहे.

कंपनीने सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 2.52 कोटी रुपयांचे सहा महिन्यांचं भाडं दिलं आहे आणि दर तीन वर्षांनी भाड्यामध्ये 15 टक्क्यांची वाढ होईल. देखभाल शुल्क म्हणून कंपनीला प्रति चौरस फूट प्रति महिना 110 रुपये द्यावे लागतील. दोन्ही पक्षांमध्ये 133 महिन्यांसाठी करार आहे आणि करार 60 महिन्यांनी वाढवण्याची तरतूद आहे. दरम्यान, हे ॲपल स्टोअर याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता असल्याचंही ॲपलचं म्हणणं आहे.

Web Title: 42 lakhs per month rent 3 floors for the first Apple store share revenue Here are the terms in the contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.