Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४३ हजारांवर चांदी ; सोनेही महागले

४३ हजारांवर चांदी ; सोनेही महागले

जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत गुरुवारी चांदीचा भाव ४३ हजार रुपयांच्या पुढे गेला.

By admin | Published: July 1, 2016 04:45 AM2016-07-01T04:45:08+5:302016-07-01T04:45:08+5:30

जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत गुरुवारी चांदीचा भाव ४३ हजार रुपयांच्या पुढे गेला.

43 thousand silver; Gold is expensive | ४३ हजारांवर चांदी ; सोनेही महागले

४३ हजारांवर चांदी ; सोनेही महागले


नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत गुरुवारी चांदीचा भाव ४३ हजार रुपयांच्या पुढे गेला. त्याचप्रमाणे सोन्याच्या भावालाही १00 रुपयांची झळाळी मिळाली.
ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडणार असल्यामुळे युरोपातील केंद्रीय बँका अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रातील मागणी तसेच शिक्के निर्मात्यांनी केलेली जोरदार खरेदी या बळावर तयार चांदी ३९0 रुपयांनी वाढून ४३,३00 रुपये किलो झाली. काल चांदीचा भाव ८00 रुपयांनी वाढला होता. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव २५0 रुपयांनी वाढून ४२,९५0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ७४ हजार रुपये, तर विक्रीसाठी ७५ हजार रुपये प्रति शेकडा झाला.
न्यूयॉर्कमध्ये सोने 0.५२ टक्क्याने वाढून १,३१८.३0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी २.९३ टक्क्यांनी वाढून १८.२७ डॉलर प्रति औंस झाली. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारात दिसून आला. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १00 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,३५0 रुपये आणि ३0,२00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: 43 thousand silver; Gold is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.