नवी दिल्ली : यंदाच्या तिस-या म्हणजेच सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत भारतात तब्बल ४४ दशलक्ष स्मार्टफोन विकले गेले आहेत. हा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. या काळात स्मार्टफोन बाजारात शिओमी, सॅमसंग, विवो आणि ओप्पो या बँडचा बोलबाला राहिला.काऊंटर पॉइंट रिसर्चच्या अभ्यासानुसार, या तिमाहीत सणासुदीच्या हंगामाआधी स्मार्टफोन विक्रेत्यांच्या शिपमेंटमध्ये ५ टक्के वृद्धी झाली. २७ टक्के बाजार हिश्श्यासह शिओमी पहिल्या स्थानी राहिली. त्यापाठोपाठ सॅमसंग (२३ टक्के), विवो (१० टक्के), मायक्रोमॅक्स (९ टक्के), ओप्पो (८ टक्के) यांचा क्रमांक लागला.
तिसऱ्या तिमाहीत ४४ दशलक्ष स्मार्ट फोनची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 2:59 AM