Lokmat Money > बिझनेस न्यूज > स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक

स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक

विक्रम संवत २०८० मध्ये विदेशी संस्थांच्या (एफआयआय) शेअर बाजारातील गुंतवणुकीला काही प्रमाणात ओहोटी लागली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 05:54 AM2024-10-31T05:54:08+5:302024-10-31T05:54:32+5:30

विक्रम संवत २०८० मध्ये विदेशी संस्थांच्या (एफआयआय) शेअर बाजारातील गुंतवणुकीला काही प्रमाणात ओहोटी लागली होती.

4.6 lakh crore invested by indigenous institutions, an all-time high in the stock market | स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक

स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक

नवी दिल्ली : येत्या शुक्रवारी दिवाळीच्या दिवशी संपत असलेल्या विक्रम संवत २०८० मध्ये भारतातील स्वदेशी गुंतवणूक संस्थांनी (डीआयआय) ४.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली आहे. कोणत्याही संवतमध्ये आतापर्यंत झालेली ही सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे. विक्रम संवत २०८० मध्ये विदेशी संस्थांच्या (एफआयआय) शेअर बाजारातील गुंतवणुकीला काही प्रमाणात ओहोटी लागली होती.

या काळात विदेशी संस्थांनी केवळ ९०,९५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. विदेशी संस्थांच्या घटलेल्या गुंतवणुकीची भरपाई स्वदेशी संस्थांनी केली आहे, असे आकडेवारीवरून दिसते. स्वदेशी संस्थांमुळे या संवतमध्ये शेअर बाजार तरला आहे. वास्तविक, या महिन्यात बाजारात करेक्शन आलेले होते. असे असतानाही निफ्टी ५० आणि बीएसई सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकांनी ३ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

डीआयआयच्या गुंतवणुकीचा फायदा निर्देशांकांना झाला. माहिती तंत्रज्ञान, वाहन, औषधी, ऊर्जा आणि सार्वजनिक उपक्रम या क्षेत्रांनी जबरदस्त कामगिरी केली. संवत २०८० मध्ये निफ्टी ५० निर्देशांक सप्टेंबर २०२४ मध्ये प्रथमच २६ हजार अंकांच्या वर चढला.  अलीकडील ७ टक्क्यांच्या घसरणीनंतरही निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे २५.३ टक्के आणि २३.३ टक्के वाढलेले आहेत.

मागील ७ वर्षांतील संवत वर्षांची कामगिरी
संवत    सेन्सेक्स     निफ्टी       
२०७४    ७.४ टक्के    ३.१ टक्के
२०७५    ११.६ टक्के    १०.० टक्के
२०७६    ११.२ टक्के    ९.८ टक्के
२०७७    ३७.६ टक्के    ४०.२ टक्के
२०७८    ०.८ टक्के    १.४ टक्के
२०७९    ९.४ टक्के    १०.५ टक्के
२०८०    २३.३ टक्के    २५.३ टक्के
(२८ ऑक्टोबर २०२४ च्या आकडेवारीनुसार)

Web Title: 4.6 lakh crore invested by indigenous institutions, an all-time high in the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.