बीजिंग : फॉक्सवॅगनच्या ४६ लाख कारच्या एअरबॅग सदोष असल्याने त्या माघारी बोलावण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या सर्व कार्स चीनमधील आहेत. या कार्ससाठीच्या एअर बॅग जपानमधील टकाटा या कंपनीने तयार केल्या आहेत. ती कंपनी आता दिवाळखोरीमध्ये गेली आहे.
आयात आणि चीनमध्ये तयार केलेल्या २00५ पासूनच्या विकलेल्या या कार असून, त्या मार्च २0१८ पर्यंत परत बोलावण्यात येतील. चीनमध्ये गेल्या वर्षी फॉक्सवॅगनच्या ४0 लाख कार विकण्यात आल्या होत्या. टकाटा या कंपनीने होंडा व टोयोटा या कंपन्यांच्या कार्ससाठीही एअर बॅग बनवल्या होत्या. एअर बॅगमधील घोटाळा अलीकडेच उघडकीस आला. या कंपनीच्या किमान एक कोटी एअर बॅग सदोष असण्याची शक्यता आहे.
एअर बॅगचा स्फोट होेऊन १७ जण मरण पावल्यानंतर टकाटा कंपनीवर सर्व स्तरांतून आणि देशातून टीका सुरू झाली. त्यानंतर ही कंपनी दिवाळखोरीमध्ये गेली.
४६ लाख फॉक्सवॅगन मोटारी सदोष एअर बॅगमुळे माघारी
फॉक्सवॅगनच्या ४६ लाख कारच्या एअरबॅग सदोष असल्याने त्या माघारी बोलावण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या सर्व कार्स चीनमधील आहेत. या कार्ससाठीच्या एअर बॅग जपानमधील टकाटा या कंपनीने तयार केल्या आहेत. ती कंपनी आता दिवाळखोरीमध्ये गेली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:42 AM2017-09-15T00:42:37+5:302017-09-15T00:42:54+5:30