Join us  

पाच वर्षांत ४७ टक्के लोकांनी सरंडर केली जीवन विमा पॉलिसी, पाहा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 4:50 PM

सध्याच्या काळात जीवन विमा आवश्यक झाला आहे. असं असलं तरी जीवन विम्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीये.

सध्याच्या काळात जीवन विमा आवश्यक झाला आहे. असं असलं तरी जीवन विम्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीये. गेल्या पाच वर्षांत, ४७ टक्के लोकांनी एकतर त्यांची जीवन विमा पॉलिसी सरेंडर केलीये किंवा त्यांनी आपल्या पॉलिसीचं नूतनीकरण केलेलं नाही. एसबीआय लाइफच्या फायनान्शिअल इम्युनिटी रिपोर्टनुसार ६८ लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे पुरेसे विमा कवच आहे, परंतु प्रत्यक्षात केवळ ६ टक्के लोकांकडे पुरेसे विमा संरक्षण आहे.

देशात ७१ टक्के लोक असेही आहेत, की जे फायनान्शिअल इम्युनिटीसाठी विमा आवश्यक आहे हे मानतात, परंतु ते विमा घेत नाहीत. ८० टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार फायनान्शिअल सिक्युरिटीसाठी विमा आवश्यक आहे. यानंतरही ९४ टक्के लोकांकडे एकतर विमा नाही किंवा त्यांनी विमा कव्हर घेतलेलं नाही, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आलाय. ३७ टक्के लोक असे आहेत, ज्यांनी विम्याऐवजी अन्य सोर्स ऑफ इन्कम घेतलं आहे. तर ४१ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार सेकंडरी इन्कममुळे फायनान्शिअल इम्युनिटी अधिक मजबूत होईल असं म्हटल्याचा दावा करण्यात आलाय.

का सरंडर करतायतगेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्या विमा पॉलिसी सरंडर केल्यात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महागाई आहे. वाढत्या महागाईमुळे लोकांचे खर्च वाढले आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय खर्चातही वाढ झाली आहे. यामुळे बहुतांश लोकांनी आपल्या जीवन विमा पॉलिसी सरंडर केल्यात.

टॅग्स :व्यवसाय