Join us

नववर्षात श्रीमंतांचे ४७.६२ लाख कोटी बुडाले, अंबानींच्या संपत्ती घट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 9:11 AM

शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमुळे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवीन वर्ष जगभरातील ५०० श्रीमंतांसाठी धक्कादायक ठरले आहे.  शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरतेमुळे जानेवारीच्या २८ दिवसांत त्यांची मालमत्ता ४७.६२ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ५८२ लाख कोटी डॉलरवर आली आहे. ३ जानेवारीपर्यंत त्यांच्याकडे ६३० लाख कोटी रुपये होते.दि. ३ जानेवारीपासून जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. युक्रेन आणि रशियामधील संघर्ष, परकीय गुंतवणूकदारांची सावध गुंतवणूक आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक यंदा चार ते पाच वेळा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारांची घसरगुंडी सुरू असून, श्रीमंतांना त्याचा मोठा फटका बसत आहे.

उद्योगपतींच्या संपत्तीत घट (अब्ज डॉलरमध्ये)जेफ बेजोस    २७एलॉन मस्क    २५.८बर्नार्ड अरनॉल्ट    १८.४मार्क झुकरबर्ग    १५.२सर्जी ब्रीन    १२.४स्टिव्ह बामर    १२.२बिल गेट्स    ११मुकेश अंबानी    २.०७

यांच्या संपत्तीत वाढnगौतम अदानी -  ८.६८ अब्ज डॉलरnवॉरेन बफे - २.४ अब्ज डॉलर

या आठवड्यात सर्वांत मोठा बदल म्हणजे जगातील सर्वांत मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे हे मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत झाले आहेत. २८ जानेवारी रोजी ९१ वर्षीय वॉरेन बफे यांनी हे स्थान गाठले. या वर्षात ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, अशा जगातील प्रमुख १० मध्ये ते एकमेव श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. 

टॅग्स :मुकेश अंबानीशेअर बाजार