पुणे : देशातील आघाडीची प्रवासी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आल्टो के१० व्हीएक्सआय, एस-प्रेसो आणि सेलेरिओ एलएक्सआय या आपल्या ३ लोकप्रिय मॉडेलसाठी ‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’ आणली आहे. या गाड्यांची किंमत आकर्षकरीत्या ४.९९ लाख रुपये आहे.
मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन व विक्री) पार्थो बॅनर्जी यांनी सांगितले की, ‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’चे मॉडेल्स आणि ‘एजीएस’च्या किमतीतील कपात यातून कंपनीच्या व्यवसाय विस्तारास मदत होईल. कारची मालकी व अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यापक समाज घटकापर्यंत पोहोचविण्याच्या बाबतीतील कंपनीचे समर्पण या निर्णयांतून दिसून येते.
‘ड्रीम सीरिज लिमिटेड एडिशन’ची मॉडेल्स फक्त जून २०२४ मध्येच उपलब्ध असतील. या मॉडेल्समध्ये अत्याधुनिक वाढीव फिचर्स किफायतशीर किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय निवडक मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. (वा.प्र)
या कार स्वस्त
कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, मारुती सुझुकीच्या काही निवडक मॉडेलच्या एजीएस व्हेरियंटच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यात आल्टो के१०, एस-प्रेसो, सेलेरिओ, वॅगन-आर, स्विफ्ट डिझायर, बलेनो, फ्रॉन्क्स आणि इग्निस यांचा समावेश आहे.