नवी दिल्ली : स्वस्तात मिळत मोबाइल सेवा मिळत असल्याने व ३जी व २जी फोन सोडून लोक ४जी फोन घेण्याकडे वळल्याने ४जी डेटा वापरणाऱ्यांच्या संख्येत एका वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. भारतात ४जी मोबाइल डेटा वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. महिन्याला १० जीबीपेक्षा डेटा वापरणाऱ्यांची संंख्या ४३.२ कोटींहून अधिक आहे.
महिन्याला ४जी डेटा वापरण्याचे प्रमाण सरासरी १० जीबीच्या जवळ गेले
2015 805 एमबी
2016 2.7 जीबी
2017 5.7 जीबी
2018 9.6 जीबी
२०१७च्या तुलनेत २०१८मध्ये काय बदल
109 टक्के वाढली डेटा वापरणाऱ्यांची एकूण संख्या. त्यापैकी ९२ टक्के केवळ ४जी डेटा वापरणारे होते.
132 टक्क्यांनी वाढले ४जी नेटवर्कचे युजर्स, 01 टक्के घटली ३जी वापरणाऱ्यांची संख्या.
50 कोटी मोबाईल ब्रॉडबॅण्ड युझर्स भारतात आहेत. ही संख्या दक्षिण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
43.2 कोटी ४जी युजर्स २०१८ मध्ये आहेत. त्यात २०१७च्या तुलनेत १३७ टक्के वाढ झाली आहे. 33.5 कोटी ४जी कॅपेबल फोन आहेत.
कशासाठी वापरला जातो डेटा
70-80%
व्हिडीओ
12-14%
ब्राऊझिंग
10-12%
सोशल मीडिया
5-10%
इतर