मुंबई, दि. 8- रिलायन्स जिओने 4G डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे. रिलायन्स जिओचा एव्हरेज डाऊनलोड स्पीड जून महिन्याच्या अखेरपर्यंत 18 मेगाबीट पर सेकंद (एमबीपीएस) असल्याची नोंद झाली आहे. ट्राय टेस्टनुसार, जून महिन्यात जिओचा डाऊनलोड स्पीड 18 एमबीपीएस होता. ट्रायच्या टेस्टनुसार भारती एअरटेल या कंपनीचा स्पीड 8.91 एमबीपीएस इतका होता. खाजगी ब्रॉडबँड स्पीड मोजणी करणाऱ्या कंपन्यांनी घेतलेल्या चाचणीनुसार एअरटेल कंपनी सर्वात वेगवान 4G सेवा देत असल्याचा दावा करते आहे. ट्रायच्या अहवालात जिओनंतर वोडाफोन, आयडीया आणि एअरटेल या कंपन्या आहे. बिझनेस स्टॅण्डर्डने ही बातमी दिली आहे.
जून महिन्याच्या सुरूवातील रिलायन्स जिओचा 4जी डाऊनलोड स्पीड 19.12 इतका होता. पण महिन्याच्या अखेरीस स्पीडमध्ये थोडी घसरण होऊन तो 18.65 इतका झाला. असं असूनही जिओचा डाऊनलोड स्पीड हा प्रतिस्पर्धी वोडाफोनपेक्षा 68 टक्क्याने जास्त आहे.
द टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थातच ट्राय त्यांच्या 'मायस्पीड' अॅप्लिकेशनच्या मदतीने मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांना डाऊनलोड स्पीड जमा करते.
ट्रायने दिलेल्या निकालानुसार, जून महिन्याच्या शेवटपर्यंत वोडाफोन कंपनीचा 11.07 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड होता,अशी नोंद झाली आहे. त्या खालोखाल आयडीया कंपनीने नोंद केली आहे. आयडीयाचा डाऊनलोड स्पीड 9.46एमबीपीएस होता आणि त्यानंतर एअरटेल कंपनीचा नंबर लागतो आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचा डाऊनलोड स्पीड 8.91एमबीपीएस होता.
3जी डाऊनलोडिंग स्पीडच्या यादीत वोडाफोन कंपनी अव्वल आहे. वोडाफोनचा डाऊनलोड स्पीड 5.16 इतका होता. तर त्यानंतर एअरटेल, आयडीया, एअरसेल आणि बीएसएनएल या नेटवर्कचा नंबर लागतो.त्यांचा डाऊनलोड स्पीड अनुक्रमे 3.56 एमबीपीएस, 2.94 एमबीपीएस, 2.39 एमबीपीएस आणि 1.65 एमबीपीएस इतका आहे.
रिलायन्स जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच विविध ऑफर्स देते आहे. आता जिओकडून 4जी सपोर्ट असणारा फीचर फोन बाजारात आणला जातो आहे. रिलायन्सचा 4जी स्मार्टफोन मोफत असेल असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जाहीर केलं होतं. अर्थात, कुठलीही गोष्ट मोफत दिली तर तिचा दुरुपयोग होतो असे सांगत, हे टाळण्यासाठी 1500 रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेण्यात येणार असून तीन वर्षांनी ही रक्कम ग्राहकाला परत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिओ स्मार्टफोनमध्ये 12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून, तीन वर्षांनंतर पूर्ण रिफंड मिळणार आहे