Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांनाही आता 'फाईव्ह डेज वीक'... मेसेज व्हायरल, पण खरी बातमी वेगळीच!

बँकांनाही आता 'फाईव्ह डेज वीक'... मेसेज व्हायरल, पण खरी बातमी वेगळीच!

सोशल मीडियावरील बँकांच्या पाच दिवसांच्या आठवड्याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 06:06 PM2019-06-06T18:06:24+5:302019-06-06T18:16:27+5:30

सोशल मीडियावरील बँकांच्या पाच दिवसांच्या आठवड्याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे.

5-Day Week For Banks From June 1? Old Hoax Revived | बँकांनाही आता 'फाईव्ह डेज वीक'... मेसेज व्हायरल, पण खरी बातमी वेगळीच!

बँकांनाही आता 'फाईव्ह डेज वीक'... मेसेज व्हायरल, पण खरी बातमी वेगळीच!

Highlightsबँकांनाही आता 'फाईव्ह डेज वीक'?गृह-वाहन कर्ज स्वस्त होणार, EMI घटणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा

मुंबई : देशातील बँक कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आल्याचे सध्या व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियात फिरत आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून ही अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

'बँकांचे कामकाज आठवड्यातील पाच दिवस करण्याच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बँकांना आता  1 जूनपासून प्रत्येक शनिवारी सुट्टी असणार आहे. तसेच, बँकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडे सहा पर्यंत बँकांचे कामकाज असणार आहे', असा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावरील बँकांच्या पाच दिवसांच्या आठवड्याबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेण्यात आलेला नाही किंवा यासंबधी कोणताही आदेश जारी करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.    

(गृह-वाहन कर्ज स्वस्त होणार, EMI घटणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा दिलासा)

दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. यामध्ये सोशल मीडियात सातत्याने बँका आठवड्यात पाच दिवस कार्यरत राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे वृत्त खरे नाही. बँका दरमहा केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बंद राहतील. तसेच, रिझर्व्ह बँकेकडून यासंबंधी कोणताही आदेश काढण्यात आला नाही, असे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले होते.

(ऑनलाइन पद्धतीनं पैसे देवाण-घेवाणीवरचं शुल्क हटवलं, RBIचा मोठा निर्णय)



 

Web Title: 5-Day Week For Banks From June 1? Old Hoax Revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.