नवी दिल्ली : जुने वाहन भंगारात काढल्यास नव्या वाहनाच्या खरेदीवर ५ टक्के सवलत मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. गडकरी यांनी सांगितले की, नव्या भंगार (स्क्रॅपिंग) धोरणाअंतर्गत ही सवलत वाहन उत्पादकांकडून खरेदीदारास मिळेल.
नव्या भंगार धोरणात चार प्रमुख तरतुदी आहे. ५ टक्के सवलतीबरोबरच, जुन्या वाहनांवर हरित कर लावण्यात येईल. या वाहनांना नियमित तंदुरुस्ती व प्रदूषण चाचण्या बंधनकारक करण्यात येतील आणि देशभरात दुरुस्ती केंद्रे काढण्यात येतील. ही दुरुस्ती केंद्रे खासगी भागीदारीतून उभारली जाणार आहेत. यासाठी केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत करणार असल्याचेही गडकरींनी सांगितले.