Reliance AGM 2023: देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी एजीएम आज पार पडली. देशात हजारो कंपन्या असल्या तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती रिलायन्सच्या एजीएमची होती. यावेळी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या. एजीएमदरम्यान रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी रिलायन्स रिटेल रोजगार देण्यात पुढे असून २.४५ लाख लोकांना थेट रोजगार देत असल्याची माहिती दिली.
रिलायन्स रिटेलचा वार्षिक महसूल २.६० लाख कोटी रुपये राहिला. यामध्ये वार्षिक ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. यासोबतच कंपनीला ९१८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. रिलायन्स रिटेल जगातील टॉप १० रिटेल कंपन्यांच्या यादीत आहे. कंपनीचे २५ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत आणि यापूर्वीचं वर्ष कंपनीसाठी उत्तम राहिल्याची माहिती इशा अंबानी यांनी दिली.
व्याप्ती वाढतेयरिलायन्स रिटेलची व्याप्ती सातत्यानं वाढत आहे. देशातील ९८ टक्के पिनकोडवर याची सेवा मिळत आहे. देशात १८ हजारांपेक्षा अधिक रिलायन्स रिटेल स्टोर्स खुली झाली आहेत. गेल्या एका वर्षात ३३०० नवी स्टोअर्स सुरू करण्यात आली आहेत. देशात आता त्यांची संख्या वाढून १८०४० वर पोहोचल्याचे ईशा अंबानी म्हणाल्या. रिलायन्स रिटेल देशभरात तब्बल २.४५ लाख लोकांना थेट रोजगार देत आहे. तर अप्रत्यक्षपणे लाखो कर्मचारी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
५ लाख लॅपटॉप विकलेयावेळी त्यांनी रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाबद्दल माहिती दिली. याची पोहोच ३० टक्के भारतीयांपर्यंत आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीनं ५ लाख लॅपटॉप्सची विक्री केली, तर या आर्थिक वर्षादरम्यान ५४ कोटी कपडे विकल्याचंही ईशा अंबानी यांनी नमूद केलं.