Lokmat Money > बिझनेस न्यूज > 5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 

5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 

आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 04:27 PM2017-07-31T16:27:06+5:302017-07-31T16:46:32+5:30

आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे

5-ogasataparayanta-vaadhalai-inakama-taenkasa-raitarana-karanayaacai-maudata | 5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 

5 ऑगस्टपर्यंत वाढली इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 

मुंबई, दि. 31 - इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला न नसल्याने चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.  आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिर्टन फाईल करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आज शेवटची तारीख असल्याने अनेकांची धावाधाव सुरु होती. मात्र अनेकांनी तारीख वाढवून देण्याची मागणी लक्षात घेता, तसंच करदात्यांचा वाढता ओघ पाहता प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी तुमच्याकडे 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

करदात्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मुदतवाढ देण्यात येत आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे. 2016-17 या आर्थिक वर्षाचं आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 5 ऑगस्ट 2017 ही मुदत असेल.

आर्थिक वर्ष २०१६-१७ चे प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न-आयटीआर) भरण्याचा शेवटचा दिवस ३१ जुलै असून ही मुदत वाढवून दिली जाणार नाही, असे एका अधिकाºयाने रविवारी सांगितले होते.  आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिकली फाइल झालेले सध्याच दोन कोटी रिटर्न आले आहेत. करदात्याने रिटर्न वेळेतच दाखल करावे, असेही अधिका-याने सांगितलं होते. 
 

Web Title: 5-ogasataparayanta-vaadhalai-inakama-taenkasa-raitarana-karanayaacai-maudata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.