Join us

धान्य, डाळींसह शेतमालावर आता ५ टक्के GST; व्यापारी आक्रमक, ग्राहकांना मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 10:21 AM

ब्रॅण्डेड नसलेल्या धान्यालाही कराच्या जाळ्यात ओढण्यात आल आहे. पोत्यात पॅकिंग करुन लेबलसह विकले जाणारे प्रत्येक धान्य आता ५ टक्के जीएसटीला पात्र राहील.

सांगली : अधिकाधिक व्यावसायिकांना कराच्या जाळ्यात पकडण्याच्या प्रयत्नात जीएसटी परिषदेने थेट शेतमालावरही कर लागू केला आहे. धान्य, डाळी आणि अन्य शेतमालावर ५ टक्के जीएसटी लावला असून १८ जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. याविरोधात व्यापारी आक्रमक झाले आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सने शुक्रवारी (दि. ८) पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे.

ब्रॅण्डेड नसलेल्या धान्यालाही कराच्या जाळ्यात ओढण्यात आल आहे. पोत्यात पॅकिंग करुन लेबलसह विकले जाणारे प्रत्येक धान्य आता ५ टक्के जीएसटीला पात्र राहील. शेतकऱ्याने बाजारात आणलेले धान्य करमुक्त असेल, पण त्याला लेबल लावून विक्री करताना मात्र ५ टक्के जीएसटी भरावा लागेल. सर्वसामान्यांच्या ताटातील दररोजचे अन्न असलेली ज्वारी, तांदूळ, गहू, कडधान्ये, डाळी कराच्या जाळ्यात आल्या आहेत.

कशी वाढेल महागाई?गव्हाचे ५० किलोचे पोते सध्या १५०० रुपयांना मिळत असेल, तर जादा ७५ रुपये मोजावे लागतील. १४० रुपये किलोची तूरडाळ १४७ रुपयांना, तर १०० रुपयांची मसूरडाळ १०५ रुपयांना घ्यावी लागेल. पॅकिंग करुन विकली जाणारी ज्वारी महागणार.

नव्या कररचनेमुळे व्यापारी संतप्त आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सने यावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे. नव्या कररचनेमुळे महागाई वाढणार आहे. याचा फेरचिवार करणे आवश्यक आहे.    - प्रशांत पाटील,  सचिव चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली.