नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. (5 things to know about rising Petrol and Diesel Prices)भारत खनिज तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही. आपल्याला ८९ टक्के तेल आयात करावं लागतं. याशिवाय भारताला एकूण गरजेपैकी ५३ टक्के नैसर्गिक वायू आयात करावा लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम भारतावर होतो. सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. या पार्श्वभूमीवर ५ महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पुण्यातही पेट्रोलचे शतक; पॉवर पेट्रोल शंभरीपार, तर साधे पेट्रोल ९६.६२ रुपये लिटरकेंद्र आणि राज्य सरकारांकडून मोठी करवाढआंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमती आणि केंद्र, राज्य सरकारकडून लादले जाणारे कर या दोन प्रमुख घटकांमुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे केंद्र आणि राज्यांचा महसूल घटला. लॉकडाऊन काळातील महसुली तूट भरून काढण्यासाठी केंद्रानं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १९.९८ रुपये प्रति लिटरवरून ३२.९८ रुपयांवर नेलं. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क १५.८३ रुपयांवरून ३१.८३ रुपयांपर्यंत वाढवलं. याशिवाय राज्य सरकारांनी मूल्यवर्धित करांमध्ये (व्हॅट) वाढ केली आहे.महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या 'या' राज्यात तब्बल 12 रुपयांनी स्वस्त मिळतंय पेट्रोल; असं आहे कारणआंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढलेफेब्रुवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर प्रति बॅरल ६५.०९ प्रति बॅरल होते. एप्रिल २०२० मध्ये कोरोना संकटामुळे तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण झाली. तेलाचे दर १९ बॅरलपर्यंत कोसळले. मात्र आता जगातील अनेक देशांमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. तेलाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या दरांत वाढ होत आहे.भारतात पेट्रोल, डिझेलच्या वाढ होण्यामागचं प्रमुख कारण काय?खरंतर पेट्रोल, डिझेलचा दर कमी आहे. मात्र त्यापेक्षा त्यावरील करांचं प्रमाण जास्त आहे. वाहतूक खर्च, डीलरचं कमिशन, केंद्राकडून आकारण्यात येणारं उत्पादन शुल्क आणि व्हॅट यांच्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होते. दिल्लीत पेट्रोलच्या दरातील करांचा वाटा ६० टक्के आहे. तर डिझेलच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के इतकं आहे. भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरलेशेजारच्या देशांमध्ये काय दर?महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवरून भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला. त्यात त्यांनी शेजारच्या देशांमधील पेट्रोलच्या दरांचा संदर्भ दिला. ग्लोबल पेट्रोल प्राईजेस डॉट कॉमच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारीला श्रीलंकेत पेट्रोलचा दर ६०.२९ रुपये होता. नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत ६९.०१ रुपये, पाकिस्तानात ५१.१२ रुपये, बांग्लादेशात ७६.४३ रुपये होती. शेजारी देशांमध्ये डिझेलदेखील स्वस्त आहे. श्रीलंकेत ३८.९१ रुपये, नेपाळमध्ये ५८.३२, पाकिस्तानात ५३.०२, बांग्लादेशात ५५.७८ रुपयांनी पेट्रोल विकलं जातं.नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून इंधन दरात किती बदल?नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचा दर ७१.१४ रुपये प्रति लिटर होता. तर डिझेलसाठी ५६.७१ रुपये मोजावे लागत होते. तेव्हापासून आजपर्यंत पेट्रोलच्या दरात २६ टक्के, तर डिझेलच्या दरात ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोदींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात एका बॅरलचा दर ११० अमेरिकन डॉलर होता. आज एका बॅरलसाठी ६५ अमेरिकन डॉलर मोजावे लागत आहेत.
पेट्रोल, डिझेलचे दर नेमके कशामुळे पेटले?; जाणून घ्या ५ महत्त्वाच्या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 10:12 AM