नवी दिल्लीः सर्व काही व्यवस्थित झाल्यास येत्या काही दिवसांत नोकरदारांना ग्रॅच्युइटीसाठी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार नाही. आगामी काळात ग्रॅच्युइटीचा कालावधी एक वर्ष असू शकतो. याचा अर्थ असा की, आपण एखाद्या कंपनीत वर्षभरासाठी काम करत असल्यास आपण ग्रॅच्युइटीला पात्र राहणार आहोत. आतापर्यंत कर्मचार्यांना ग्रॅच्युइटीसाठी एका कंपनीत सतत ५ वर्षे काम करावे लागते.
वास्तविक संसदेच्या स्थायी समितीने ग्रॅच्युइटीसाठी 1 वर्षाची मुदत निश्चित करण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात सभापतींना अहवालही सादर करण्यात आला आहे. समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटीसाठी सुरू असलेल्या कामकाजाचा कालावधी पाच वर्षांवरून एका वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली आहे. या व्यतिरिक्त सामाजिक सुरक्षा योजना चालविण्यासाठी त्यांच्या निधीचा स्रोत स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
कंपनीकडून त्यांच्या कर्मचार्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. एक प्रकारे, कंपनीला देण्यात येणा-या सेवेच्या बदल्यात कर्मचार्यांना मोबदल्याच्या स्वरूपात ग्रॅच्युइटी दिली जाते. त्याची जास्तीत जास्त मर्यादा २० लाख रुपये आहे. सध्या ग्रॅच्युइटी फक्त जेव्हा एखाद्या कंपनीत पाच वर्ष काम करतो, तेव्हाच त्याला मिळते. मृत्यू किंवा अपंगत्व असल्यास, ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यासाठी नोकरीची 5 वर्षे पूर्ण करणे आवश्यक नाही.
ग्रॅच्युइटीची 5 वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार! सरकार घेऊ शकते मोठा निर्णय
आतापर्यंत कर्मचार्यांना ग्रॅच्युइटीसाठी एका कंपनीत सतत ५ वर्षे काम करावे लागते.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:34 PM2020-08-04T17:34:12+5:302020-08-04T17:34:24+5:30