- चंद्रकांत दडस
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले, तरीही त्यात अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. देशाच्या ग्रामीण भागातील तब्बल ५०.२ टक्के तर शहरी भागातील ८ टक्के जनता स्वयपांक, प्रकाश आणि उष्णतेसाठी जळण म्हणून लाकूडच वापरत आहे. देशातील ३७ टक्के जनतेला अद्याप स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन म्हणून गॅस मिळत नसल्याचे दाहक वास्तव सरकारी अहवालातून समोर आले आहे.
स्वयंपाकासाठी इंधन म्हणून काय?
इंधन स्रोत ग्रामीण भाग शहरी भाग एकूण
सरपण ४६.७ ६.५ ३३.८
एलपीजी ४९.४ ८९.० ६२.०
इतर स्रोत ३.७ २.८ ३.५
स्वयंपाकाची ०.२ १.७ ०.७
व्यवस्थाच नाही
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसएसओ)ने जानेवारी २०२० ते ऑगस्ट
२०२१ या कालावधीत देशात सर्वेक्षण करून हा अहवाल सादर केला आहे.
यात देशभरातील २ लाख ७६ हजार ४०९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.