Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे

भारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे

२०१८ मध्ये भारतात असलेल्या अब्जाधीशांची संपत्ती दररोज तब्बल २,२०० कोटी रुपयांनी वाढत होती, तसेच देशातील १ टक्का अतिश्रीमंतांची संपत्ती वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:33 AM2019-01-22T04:33:17+5:302019-01-22T04:33:27+5:30

२०१८ मध्ये भारतात असलेल्या अब्जाधीशांची संपत्ती दररोज तब्बल २,२०० कोटी रुपयांनी वाढत होती, तसेच देशातील १ टक्का अतिश्रीमंतांची संपत्ती वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढली आहे.

50 percent of India's wealth is just 9 billionaires | भारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे

भारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे

दावोस : २०१८ मध्ये भारतात असलेल्या अब्जाधीशांची संपत्ती दररोज तब्बल २,२०० कोटी रुपयांनी वाढत होती, तसेच देशातील १ टक्का अतिश्रीमंतांची संपत्ती वर्षभरात ३९ टक्क्यांनी वाढली आहे. तळातील अर्ध्या लोकसंख्येच्या संपत्तीत मात्र अवघी ३ टक्क्यांची भर पडली आहे.
ऑक्सफॅमने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पाच दिवस चालणाऱ्या वार्षिक बैठकीच्या आधी ऑक्सफॅमचा हा महत्त्वाचा अहवाल आला आहे. जागतिक पातळीवर अब्जाधीशांची संपत्ती १२ टक्क्यांच्या हिशेबाने दररोज २.५ अब्ज डॉलरने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. जगातील तळाच्या अर्ध्या लोकसंख्येची संपत्ती मात्र, वाढण्याऐवजी ११ टक्क्यांनी कमी झाली आहे.
ऑक्सफॅमने म्हटले की, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी १० टक्के म्हणजे १३.६ कोटी लोक २००४ पासून सातत्याने कर्जात बुडालेल्या अवस्थेत आहेत. गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढत चाललेली ही प्रचंड दरी जगभरात मोठा असंतोष निर्माण करीत आहे. ही विषमता दूर करण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची गरज आहे.
ऑक्सफॅमचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी संचालक विनी बायनायमा यांनी सांगितले की, भारतातील गरीब लोक दोन वेळच्या जेवणासाठी अथवा आपल्या मुलांच्या औषधासाठी संघर्ष करीत असताना, देशात वाढणाºया संपत्तीपैकी बहुतांश हिस्सा मोजक्या धनाढ्यांच्या ताब्यात जाणे हे नैतिकतेचा भंग करणारे आहे. ही असमानता अशीच सुरू राहिल्यास भारतातील सामाजिक आणि लोकशाही व्यवस्था पूर्णत: कोसळून पडेल. 
>१०% अतिश्रीमंतांकडे ७७.४%संपत्ती
भारतातील १० टक्के अतिश्रीमंतांकडे ७७.४ टक्के, तर १ टक्क ा लोकांकडे ५१.५३ टक्के राष्ट्रीय संपत्ती एकवटली आहे. भारतातील ९ अब्जाधीशांकडे देशातील तळाच्या ५० टक्के लोकांच्या संपत्तीएवढी संपत्ती एकवटली आहे. गरीब असलेल्या ६० टक्के भारतीयांकडे राष्ट्रीय संपत्तीचा फक्त ४.८ टक्के हिस्सा आहे. जगातील २६ अति श्रीमंतांकडे ३.८ अब्ज लोकांच्या संपत्ती इतकी संपत्ती एकवटली आहे.

Web Title: 50 percent of India's wealth is just 9 billionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा