Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुवर्ण झळाळी ५० हजारी, सोने तारणावरील कर्जामध्ये मोठी वाढ

सुवर्ण झळाळी ५० हजारी, सोने तारणावरील कर्जामध्ये मोठी वाढ

मात्र अजूनही जगभरात रुग्णसंख्या वाढत असल्याने अर्थव्यवस्था किती उभारी घेतील याबाबत शंका आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक वाढत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 06:26 AM2020-06-26T06:26:08+5:302020-06-26T06:26:28+5:30

मात्र अजूनही जगभरात रुग्णसंख्या वाढत असल्याने अर्थव्यवस्था किती उभारी घेतील याबाबत शंका आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक वाढत आहे.

50 thousand for gold, big increase in gold mortgage loan | सुवर्ण झळाळी ५० हजारी, सोने तारणावरील कर्जामध्ये मोठी वाढ

सुवर्ण झळाळी ५० हजारी, सोने तारणावरील कर्जामध्ये मोठी वाढ

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने आठ वर्षातील उच्चांक गाठल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा भाव १0 ग्रॅमला ५० हजार रुपये झाला आहे. सोन्याने गाठलेली ही सर्वोच्च किंमत होय.मुंबईत गुरुवारी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५० हजार ३२ होता. यामध्ये तीन टक्के जीएसटीचाही समावेश आहे. रिझर्व्ह बॅँकेने काढलेल्या सॉव्हरीन गोल्ड बॉन्डस्साठी हाच दर प्रमाणित दर धरला जातो. कोरोनाच्या संकटाने जगभरातील अर्थव्यवस्थांना तडाखा दिल्यानंतर आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरू होत आहेत. मात्र अजूनही जगभरात रुग्णसंख्या वाढत असल्याने अर्थव्यवस्था किती उभारी घेतील याबाबत शंका आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक वाढत आहे.
>येत्या काही महिन्यामध्ये कोविडची भीती कमी होऊन व्यवहार पुन्हा सुरू होतील. त्यानंतर सोन्याच्या मागणीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या मागील वर्षाच्या तुलनेमध्ये खरेदी कमी प्रमाणात होत आहे.
-सुरेंद्र मेहता, राष्टÑीय चिटणीस, आयबीजेए
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे कायमच फायदेशीर ठरत असते. ही गुंतवणूक केवळ दागिन्यांच्या स्वरूपात न करता गुंतवणूक म्हणून करावी असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ हर्ष रूंग्ठा यांनी व्यक्त केले आहे.दरमहा थोडी रक्कम बाजुला काढून त्याची गुंतवणूक सोन्यामध्ये केल्यास आपल्याकडे भक्कम अशी मालमत्ता तयार होऊ शकते. याशिवाय आपल्याकडील सोने बॉन्डस्मध्ये गुंतविल्यास त्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळू शकते असे ते म्हणाले.
>१ वर्षात सोन्याचे दर तब्बल १५ हजार रुपयांनी वाढले!त्यापैकी १० हजार रूपयांची वाढ यावर्षीच्या जानेवारी महिन्यापासूनच झाली आहे.

Web Title: 50 thousand for gold, big increase in gold mortgage loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.